कियाराचं आतापर्यंतचं सर्वात बोल्ड फोटोशूट, पाहून चाहत्यांना बसला धक्का

कियाराचं आतापर्यंतचं सर्वात बोल्ड फोटोशूट, पाहून चाहत्यांना बसला धक्का

बॉलिवूड सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक कियारा अडवाणी हिने आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकलीये. लोकांना तिची स्टाइलही आवडते आणि म्हणूनच ती तिच्या लूकवर खूप प्रयोग करत असते. आता कियाराचा नवा लूक समोर आला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ‘कॅट गर्ल’ लूक देऊन तिने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. कियाराने बॉडी सूट घालत फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये तिचा आत्तापर्यंतचा सर्वात बोल्ड अवतार दिसला आहे. तिने तिच्या किलर लूकने सगळ्यांच्या नजरा आकर्षित केल्या आहेत.

कियारा अडवाणीचा हा लूक रिलायन्सच्या पहिल्या ई-कॉमर्स ब्युटी प्लॅटफॉर्म Tira च्या मोहिमेसाठी होता. तिने निळा लेटेक्स बॉडी सूट परिधान केलाय. ज्यामध्ये तिची कर्वी फिगर दिसत आहे. या सूटमध्ये तिचा एकदम किलर लूक दिसत आहे.

हॉल्टर नेकलाइन असलेला हा बॉडी सूट बॅकलेस आहे. नेकलाइनच्या खाली कंबरेपर्यंत मोठा कट आहे. जो तिच्या लूकमध्ये ग्लॅम कोशिंट वाढवत आहे. तिने अतिशय स्किन फिट अटॅच पॅन्ट घातली आहे. या लेटेक्स बॉडी सूटमध्ये देखील चमक आहे. त्यामुळे कियाराचा लूक आणखीनच चमकत आहे.

कियाराने हा लूक अगदी सहजतेने कॅरी केला आहे. त्यामुळे तिला दुसरे अतिरिक्त काहीही प्रयत्न करावे लागले नाही. चांदीला सोन्याची जोड देऊन तिने हातावर बांगड्यासारखी स्टाईल केली आहे. त्यामुळे तिचा हा लूक आणखीनच हॉट झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

कियारा अडवाणीचा हा जबरदस्त लुक पूर्ण करण्यासाठी, कियाराने केस मोकळे सोडले आहेत. तिचा मेकअप हलका न्यूड शेडमध्ये ठेवला आहे. आयलायनरसह जाड काजल लावल्याने हसीनाचे डोळे सुंदर दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tira (@tirabeauty)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;