Bigg Boss 3 OTT Grand Finale Live Updates : ‘बिग बॉस ओटीटी 3’च्या ग्रँड फिनालेला अवघे काही तासच शिल्लक, कोण होणार विजेता?
बिग बॉस ओटीटी 3 ने धमाका केला. विशेष म्हणजे यंदाचे हे सीजन करण जोहर याने होस्ट न करता बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांनी होस्ट केले. विशेष म्हणजे प्रेक्षकांना अनिल कपूर यांचा हा अंदाज जबरदस्त आवडलाय. मागील दोन सीजनचे रेकॉर्ड ब्रेक या सीजनने केले. घरात मोठे हंगामे होताना दिसले. मुळात म्हणजे हे सीजन अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नींमुळे अगोदरपासूनच चर्चेत राहिले. सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग असलेले मोठे दिग्गज या सीजनमध्ये सहभागी झाले. आज बिग बॉस ओटीटी 3 चा फिनाले पार पडतोय. अवघ्या काही तासांमध्ये समजेल की, बिग बॉस ओटीटी 3 चा विजेता अखेर कोण असेल. रात्री नऊ वाजता फिनालेला सुरूवात होईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List