छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नाव कायम राहणार; नामांतराला आव्हान देणारी याचिका SC ने फेटाळली

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नाव कायम राहणार; नामांतराला आव्हान देणारी याचिका SC ने फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे आता छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे नाव कायम राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयात छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराविरोधात याचिका करण्यात आली होती. या प्रकरणी आज सुनावणी झाली.

औरंगाबाद आणि उस्मानाबद यांचे नामांतर करून राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे केले होते. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावत नामांतर प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.

नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार हा कायद्यानुसार राज्य सरकारला आहे. तसेच नाव बदललं की काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात असणारच, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. अलहाबाद आणि औरंगाबाद नामांतर प्रकरण एकसारखे नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी 8 मे रोजी निकाल दिला होता. औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्याचा राज्य सरकारचा उच्च न्यायालयाने कायम ठेवला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;