उजनी 62 टक्क्यांवर, पाणीसाठा 95 टीएमसी

उजनी 62 टक्क्यांवर, पाणीसाठा 95 टीएमसी

सोलापूरसह तीन जिल्ह्यांची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाने अवघ्या महिनाभरात वजा साठ टक्क्यांवरून अधिक साठ टक्क्यांवर मजल मारली आहे. भीमा खोऱ्यात सुरू असलेला दमदार पावसामुळे उजनीत मोठ्या प्रमाणात पाणी दाखल होत आहे. उजनीत सध्या 95 टीएमसी पाणीसाठा असून, उजनी अधिक 62 टक्क्यांवर आले आहे.

जूनमध्ये उजनी वजा साठ टक्क्यांवर गेले होते. मात्र, मान्सूनपूर्वीच भीमा खोऱ्यात दमदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उजनीत पाणीसाठा वाढण्यात मदत होत होती. त्यातच उजनीच्या वरील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी उजनीत जमा होत आहे. जूनमध्ये उजनीत अवघे 31 टीएमसी पाणी होते. आजस्थितीला 95 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. वाढलेल्या विसर्गामुळे  उजनीत अवघ्या 10 दिवसांत 64 टीएमसी पाणी आल्याने सोलापूरकरांची चिंता मिटली आहे. उजनी धरणाची क्षमता 117 टीएमसी असली तरी 123 टीएमसीपर्यंत पाणी साठवू शकतो. सध्या उजनीत दौंड येथून 42 हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांत उजनी पूर्ण क्षमतेने भरेल, असा अंदाज  आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;