शासनाच्या योजना झाल्या उदंड, पण सर्व्हर मात्र थंड; अक्कलकोटमधील जनतेमधून नाराजीचा सूर

शासनाच्या योजना झाल्या उदंड, पण सर्व्हर मात्र थंड; अक्कलकोटमधील जनतेमधून नाराजीचा सूर

केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना उदंड झाल्या आहेत. योजनांचा नुसता सुकाळ झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. सर्व योजनांचे फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत. मात्र, शासनाच्या उदंड योजना या सर्व्हर नसल्याने थंड झाल्या आहेत. त्यामुळे अक्कलकोट शहर व तालुक्यातील जनतेमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

सध्या जन्म, मृत्यूचे दाखले ते शासनाच्या विविध योजनांचे फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येत आहेत. अक्कलकोट शहर व तालुक्यात सीएससी सेंटर व महा-ई-सेवा तसेच मोबाईलमधील विविध ऍपद्वारे अनेक योजनांचे अर्ज शासनाकडे पाठविण्यात येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही चांगली सोय आहे. विविध कार्यालयांत हेलपाटे न मारता ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरल्यास अनेकांचा वेळ वाचत आहे. या अर्जांनाच मंजुरी मिळत आहे. शेतीच्या विविध योजना, शालेय शिष्यवृत्ती योजना, शालेय फी, वसतिगृह फी प्रतिपूर्ती योजना, ज्येष्ठ नागरिकांच्या योजना, पीकविमा, पोस्ट, लाडकी बहीण अशा विविध योजनांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावे लागत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील महा-ई-सेवा तसेच सीएससी सेंटरवर गर्दी होत आहे. परंतु सर्व्हरच वारंवार डाऊन होत असल्याने माहिती भरताना व्यत्यय येत आहे. त्यामुळे अनेकांवर या योजनांपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.

शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, महिला वर्ग, विद्यार्थ्यांची महा-ई -सेवा केंद्र तसेच सीएससी सेंटरवर गर्दी होत आहे. परंतु, सर्व्हर नसल्याने विलंब होत आहे. यामुळे नागरिकांना या कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. यामध्ये वेळ आणि मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने मनस्तापाची वेळ येत आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, जेणेकरून वारंवार सर्व्हर डाऊन होणार नाही, अशी मागणी होत आहे.

कर्मचारीही त्रस्त

जुने रेशन कार्ड रद्द करून बाराअंकी कुटुंबपत्रिका काढण्यासाठी अर्जदार कुटुंबातील सर्व माहिती भरूनही अर्ज तहसील कार्यालयांतर्गत पुरवठा निरीक्षक पुरवठा विभागाकडून मान्यता मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यातच अनेक वेळा सर्व्हर डाउनमुळे नागरिकांसह कर्मचारीही त्रस्त झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;