पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन, फेटाळला; अटकेची शक्यता
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने बुधवारी वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्यावर कठोर कारवाई केली होती. पूजा खेडकर यांची आयएएस उमेदवारी रद्द केली. आता खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून त्यांच्या अटकपूर्व जामीनासाठीचा अर्ज दिल्लीच्या पतियाला हाऊस कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
वडील दिलीप खेडकर यांची कोटय़वधी रुपयांची मालमत्ता असूनही पूजा खेडकर यांनी क्रिमीलेअर सुविधेचा लाभ घेऊन ओबीसी कोटय़ातून युपीएससीसाठी अर्ज केला. तसेच दिव्यांग असल्याची चुकीची कागदपत्रे सादर केली आदी आरोप पूजा खेडकर यांच्यावर आहेत. युपीएससी आणि लाल बहादूर शास्त्र्ााr अकादमीकडून तपास सुरू आहे. याबाबत दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल केला आहे. अटकपूर्व जामीनासाठी पूजा खेडकर यांनी पतियाला हाऊस कोर्टात अर्ज केला होता. त्यावर सुनावणी झाली. यावेळी दिल्ली पोलीस, युपीएससीच्या वकिलांनी युक्तीवाद करताना खेडकर यांना अटक करून तपास करायचा आहे, असे सांगितले. खेडकर यांच्या अटकपूर्व जामिनासाठी विरोध केला. खेडकर यांनी स्वतः युक्तीवाद केला.
न्यायालयाने काय म्हटले
– पूजा खेडकर यांना युपीएससीसाठी आणखी कोणी मदत केली आहे का? याचा तपास दिल्ली पोलिसांनी करावा. त्यामुळे पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात येत आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
– पूजा खेडकर यांच्याप्रमाणे आणखी कोणी उमेदवार आहेत का ज्यांनी नियमांचे उल्लंघन करून निकषांत बसत नसतानाही क्रिमीलेअरचा लाभ घऊन ओबीसी कोटय़ातून अर्ज केला त्याचा तपासही युपीएससीने करावा. तसेच दिव्यांगाचे प्रमाणपत्र घेताना निकषांचे पालन झाले नाही, याचीही तपासणी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List