मुख्यमंत्र्यांनी बदनामी केली तरी मराठा जाब विचारायला खंबीर – मनोज जरांगे
अवयवांअभावी अनेकांचा जीव जातो. त्यामुळेमी मृत्यूनंतर देहदानाचा निर्णय घेतला आहे. आयुष्य समाजाला दिले. आता शरीरही समाजाला दान करणार आहे. फक्त तळहात आणि तळपाय कुटुंबाला देण्याचा निर्धार करत ओबीसीतून आरक्षण मागत असल्याने सरकारने षडयंत्र रचले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी कितीही बदनामी केली तरी मराठा जाब विचारायला खंबीर असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले की, 7 तारखेपासून पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे. सोलापूरपासून दौऱयाला सुरुवात होईल. न्यायालयाचा सन्मान करत असल्याने मी पुणे येथे जात आहे. उद्या कोर्टात हजर राहणार आहे. सरकारने कितीही षड्यंत्र रचले तरी न्याय करण्यासाठी न्यायालय खंबीर आहे. माझा या प्रकरणाशी संबंध नसताना 13 वर्षांपूर्वीच्या केसमध्ये गृहमंत्र्यांनी आम्हाला अडकवले.
…तर निवडणुकीत बदला घेऊ
सरकारचे शिष्टमंडळ भेटायला येणार नाही. त्यामुळे आता इतर कोणतीही चर्चा नाही. मात्र ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबत चर्चा झाली आहे. जोपर्यंत मराठा समाज पूर्णपणे ओबीसीमध्ये जात नाही तोपर्यंत ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द करू नये अन्यथा निवडणुकीत बदला घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List