मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज निर्णयाची शक्यता
शेतकऱयाला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्या प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर सरकारी पक्ष, मुळ फिर्यादी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद पुर्ण झाला आहे. उद्या (दि. 2) जामिन अर्जावर निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. पुंडलिक चौरे, बचाव पक्षातर्फे अॅड. सुधीर शहा, मूळ फिर्यादीतर्फे अॅड. अमेय बलकवडे यांनी युक्तीवाद केला. प्रत्यक्ष गोळीबार झालेला नसल्याने खूनाच्या प्रयत्नाचे कलम लागू होत नाही. त्यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना असल्याने आर्म अॅक्ट लागू होत नाही, असा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे अॅड. शहा यांनी केला. व्हिडीओवरून तिने स्वरक्षणासाठी पिस्तुल वापरल्याचे दिसून येत नाही. न्यायालयात वाद सुरू असताना जागेच्या ताब्यासाठी त्यांनी हे कृत्य केले आहे. घटनेच्या वेळी तेथे उपस्थित असणाऱया अंगरक्षकांचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तीवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List