कृष्णभक्ती अन् कलेचा मिलाप; बीकेसीत 15 कलाकारांचे ऐतिहासिक प्रदर्शन

कृष्णभक्ती अन् कलेचा मिलाप; बीकेसीत 15 कलाकारांचे ऐतिहासिक प्रदर्शन

भगवान श्रीकृष्णाचे आकर्षण आबालवृद्धांना आहे. भगवान श्रीकृष्णाच्या प्रत्येक जीवनावस्थेतून काहीतरी शिकवण मानवाला मिळते. त्यामुळे कृष्णभक्तांची संख्या जगभरात फार मोठी आहे. कृष्णाच्या उपासनेला कलेच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न ‘भक्ती – द आर्ट ऑफ कृष्ण’ प्रदर्शनातून झालाय. वांद्रे-कुर्ला काॅम्प्लेक्स येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (एनएमएसीसी) येथे ‘भक्ती – द आर्ट ऑफ कृष्ण’ प्रदर्शन सुरू आहे. या ऐतिहासिक प्रदर्शनात राजा रवि वर्मा, एम.एफ. हुसैन, मनजित बाबा, अमित अंबालाल, रकीब शॉ आणि थुकराल यासारख्या 15 प्रमुख हिंदुस्थानी कलाकारांच्या एकूण 107 कलाकृतींचा समावेश आहे.

‘भक्ती – द आर्ट ऑफ कृष्ण’ हे भव्यदिव्य असे चार मजली प्रदर्शन आहे. प्रत्येक मजल्यावर भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण साकारण्यात आले आहेत. श्रीकृष्णाचा जन्म, त्याचे बालपण ते त्यांचा अंतापर्यंतचा प्रवास म्हणजे मनसा, वाचा, क्रमणा आणि सद्गुणांच्या मार्गाचा उलगडा करण्यात आलाय.

प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे देशाच्या कानाकोपऱयात उभारण्यात आलेली नऊ कृष्ण मंदिरे. त्यातील कृष्णरुपांचे दर्शन प्रदर्शनामध्ये होईल. हे प्रदर्शन अश्विन राजगोपालन यांनी क्युरेट केलं आहे. ‘भक्ती – द आर्ट ऑफ कृष्ण’ प्रदर्शन येत्या 18 ऑगस्टपर्यंत आर्ट हाऊस, एनएमएसीसी येथे सशुल्क पाहता येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;