अखेर ‘त्या’ निर्णयानंतर जान्हवी कपूर हिचा मोठा खुलासा, म्हणाली, काहीही झाले तरीही…

अखेर ‘त्या’ निर्णयानंतर जान्हवी कपूर हिचा मोठा खुलासा, म्हणाली, काहीही झाले तरीही…

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. जान्हवी कपूर ही सध्या तिच्या उलझ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे मोठे खुलासे करतानाही जान्हवी कपूर दिसत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात धमाल करताना जान्हवी कपूर दिसली. गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. विशेष म्हणजे हे दोघे कायमच एकसोबत स्पॉट होताना देखील दिसतात. जान्हवी कपूर सोशल मीडियावर सक्रिय दिसत असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे.

जान्हवी कपूर हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये जान्हवी कपूरने मोठे खुलासे केले आहेत. जान्हवी कपूर म्हणाली की, केस छोटे केले की आई खूप जास्त ओरडत होती. मला आठवते की, मी धडक चित्रपटाच्या वेळी केस छोटे केले होते तर आई खूप जास्त ओरडली होती, तिने मला थेट म्हटले होते की तू असे कसे करू शकते?

कोणतीही भूमिका असो केस अजिबात कट करायचे नाहीत, असे तिने मला सांगितले होते. आई माझ्या केसांना तेल लावत आणि मसाज करत. यामुळेच आपण काहीही झाले तरीही केस कट न करण्याचा निर्णय जान्हवीने घेतल्याचे म्हटले. खूप मोठी संधी मिळाली तरीही आपण केस कट नाही करणार असे जान्हवी कपूर हिने म्हटले.

यासोबतच जान्हवी कपूर हिने मोठा खुलासा करत म्हटले की, उलझ चित्रपटाच्या डायरेक्टरसोबत तिचे याच गोष्टीमुळे थोडे मतभेद झाले. थोडक्यात काय तर आता कोणताही चित्रपट असो किंवा कितीही मोठा तरीही जान्हवी कपूर ही एखाद्या भूमिकेसाठी आपले केस अजिबात कट करणार नाहीये.

मध्यंतरी एक चर्चा रंगताना दिसली की, जान्हवी कपूर हिने सर्वांच्या गुपचूप शिखर पहाडिया याच्यासोबत साखरपुडा केला. शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले जाते. शिखर पहाडिया हा सुशीलकुमार शिंदे यांचा नातू असून मोठ्या संपत्तीचा तो मालक आहे. जान्हवी कपूर हिच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळत नाहीये.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;