मोबाईल टिव्ही बघू देत नाहीत, मुलांनी घेतली पालकांविरोधात पोलीस स्थानकात धाव
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. टिव्ही-मोबाईल घेण्यापासून पालकांनी रोखल्याने चक्क मुलांनी आई-वडिलांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुटुंबियांविरोधात जुवैनाइल जस्टीस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातील इंदूरमधील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंदन नगर ठाणे परिसरातील 21 वर्षीय मुलगी आणि 8 वर्षाच्या मुलाने चक्क आई-वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. मुलांनी आरोप केला आहे की, आई वडिल त्यांना मोबाईल आणि टिव्ही बघायला देत नाहीत. त्यामुळे त्यांना रोज ओरडा मिळतो. यामुळे घरात कायम वाद होतात. मुलांना पालकांची ही गोष्ट इतकी खटकली त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आई-वडिलांविरोधाीत तक्रार दाखल केली,
मुलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. कारवाई करत पोलिसांनी पालकांविरुद्ध चालानही सादर केले, तर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. या प्रकरणाला पालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. मुलांच्या या पराक्रमाने केवळ त्यांच्या कुटुंबीयांनाच नाही तर इतर लोकांनाही आश्चर्य वाटले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List