श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापकपदी मनोज श्रोत्री

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापकपदी मनोज श्रोत्री

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापक पदाचा कार्यभार पंढरपूर तहसिल कार्यालयातील निवासी नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांच्याकडे देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने नायब तहसिलदार संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मनोज श्रोत्री यांच्याकडे श्री मंदिरातील व्यवस्थापकाचा कार्यभार देण्यात आला आहे.

मनोज श्रोत्री हे 1995 ला महसूल शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. त्यांनी महसूल विभागात विविध पदावर कामकाज केलेले आहे. 2016 पासून पंढरपूर व मंगळवेढा प्रांत कार्यालय येथे नायब तहसीलदार म्हणून कामकाज पाहिले आहे. तसेच निवासी नायब तहसीलदार म्हणून तहसील कार्यालय पंढरपूर येथे कामकाज पाहिले आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांची माढा तहसिल कार्यालय येथे नायब तहसिलदार येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी निवासी नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवार दि. 1 ऑगस्ट पासून श्रोत्री यांची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक म्हणून नियुक्तीचे आदेश दिले आहेत. श्रोत्री यांनी व्यवस्थापक पदाचा कार्यभार स्विकारला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;