Pooja Khedkar : पूजा खेडकरला धक्का! न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

Pooja Khedkar : पूजा खेडकरला धक्का! न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिची उमेदवारी रद्द केल्यानंतर आता तिचा अटकपूर्व जामीन दिल्लीच्या पातियाळा न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकर यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

आलिशान कार आणि त्यावरील अंबर दिवा यामुळे वादात सापडलेल्या पूजा खेडकर हिचे एकामागून एक कारनामे उघडकीस आले होते. तिचे शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले होते. यूपीएससी आणि पंतप्रधान कार्यालयाने याची गंभीर दखल घेत यासंदर्भातील अहवाल मागवून खेडकर तिची चौकशी सुरू केली होती.  त्यात ती दोषी आढळल्यानंतर यूपीएससीने पूजा खेडकर हिच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान पूजा खेडकर हिनी अटकपूर्व जामिनासाठी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली होती. मात्र न्य़ायालयाने तिचा अटकपूर्व जामी अर्ज फेटाळला आहे.

पूजा ही 47 टक्के दिव्यांग असून यासंदर्भातील प्रमाणपत्र एम्सच्या बोर्डाने जारी केले आहे. हे प्रकरण यूपीएससीच्या कार्यकक्षेत येते आणि तिच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत, असा दावा पूजा खेडकच्या वकिलांनी कोर्टात करत अटकपूर्व जामिनाची मागणी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;