Rain Alert : महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस! IMD चा इशारा

Rain Alert : महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस! IMD चा इशारा

महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे. गुरुवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती होसाळीकर यांनी दिली.

होसाळीकर यांनी ट्विट करून 1 ते 4 ऑगस्टचा हवामान अंदाज दिला आहे. यानुसार काही चार दिवसांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. तसेच विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह ठाणे सिंधुदुर्ग, यवतमाळ, नागपूर, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला शुक्रवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भात वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, नाशिक, पालघर, ठाण्यासह विदर्भात नागपूर, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना शुक्रवारी यलो अलर्ट आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या जिल्ह्यांना शनिवारी 3 ऑगस्टला ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. तर नगर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालनासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

रविवारी 4 ऑगस्टला रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारसह पुणे, सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;