Ranbir Kapoor : रणबीर कपूरचा पहिला पगार किती होता ? त्या पैशांचं काय केलं ?
बॉलिवूडमधील हँडसम आणि तेवढाच टॅलेंटेड अभिनेता अशी रणबीर कपूरची ओळख आहे. ब्रह्मास्त्र: पार्ट वन – शिवा आणि ॲनिमल सारखे हिट चित्रपट त्याने नुकतेच दिले. आज जरी तो यशस्वी अभिनेत्यांमध्ये गणला जात असला तरी एक काळ असा होता जेव्हा त्याने ‘ब्लॅक’ चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम केलं होतं. सध्याचा आघाडीचा, नामवंत अभिनेता असलेला रणबीर कोट्यवधींची फी आकारतो. पण याच रणबीरचा पहिला पगार किती होता ? त्याने त्या पैशांचं काय केलं होतं ? हे तुम्हाला माहीत आहे का ? चला जाणून घेऊया..
रणबीरची पहिली सॅलरी किती ?
‘प्रेम ग्रंथ’ हा चित्रपट 1996 साली प्रदर्शित झाला होता. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती आणि त्यादरम्यान 14 वर्षांच्या रणबीरने या चित्रपटासाठी असिस्ट केले होते. एका मुलाखतीदरम्यान रणबीरने पहिल्या पगाराविषयी खुलासा केला. ‘ प्रेमग्रंथ चित्रपटासाठी मी असिस्टंट म्हणून काम केलं, तेव्हा मला 250 रुपये पगार मिळाला. मात्र तेव्हा हातात पैसे आल्यावर मी एखाद्या चांगल्या, आदर्श मुलाप्रमाणे आईकडे ( नीतू कपूर) गेलो आणि ते पैसे तिच्या चरणांशी ठेवले. ते पाहून माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू होते. तो माझ्यासाठी एखाद्या चित्रपटातील सीनप्रमाणे क्षण होता ‘ अशी आठवण रणबीरने सांगितली.
एका चित्रपटासाठी रणबीर किती फी आकारतो ?
त्यावेळी मिळालेले पैसे आणि ते आत्ताची कमाई… रणबीरने खूप मोठा पल्ला गाठला आहे. एकेकाळी ज्याला 250 रुपये मिळाले होते, तोच रणबीर आता एका चित्रपटासाठी 70 ते 75 कोटी रुपये आकारतो. रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा याच्या ‘ॲनिमल’ चित्रपटासाठी रणबीर कपूरने 70 कोटी फी घेतली होती. तर आणखी एका रिपोर्टनुसार, ‘रामायण’या आगामी चित्रपटातो श्रीरामाची भूमिका साकारणार असून त्यासाठी त्याने 75 कोटी रुपये चार्ज केल्याची चर्चा आहे. नितेश तिवारी यांच्या या चित्रपटाची ट्रायालॉजी असून त्याद्वारे रणबीर तगडी कमाई करणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List