हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या मुलाचे फोटो व्हायरल, वडिलांविना…

हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या मुलाचे फोटो व्हायरल, वडिलांविना…

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. हार्दिक पांड्या हा T20 वर्ल्डकपमध्ये धमाका करताना दिसला. विशेष म्हणजे वर्ल्डकप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याचे जोरदार स्वागत त्याच्या घरी करण्यात आले. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्यात जोरदार वाद सुरू असल्याची चर्चा रंगताना दिसली. मात्र, त्यावर बरेच दिवस हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी भाष्य करणे टाळले. शेवटी हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपण विभक्त होत असल्याचे जाहीर केले. नताशा आणि हार्दिक पांड्या यांचा घटस्फोट झालाय.

हार्दिक पांड्या याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशा ही भारत सोडून चक्क तिच्या माहेरी सर्बियाला गेलीये. हार्दिक पांड्या याच्यासोबत घटस्फोट झाल्यापासून नताशा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही नताशा दिसत आहे.

सध्या नताशा माहेरी मुलासोबत चांगला वेळ घालत आहे. आता नुकताच हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा लेक अगस्त्य हा चार वर्षांचा झालाय. नताशाने आपल्या लेकाचे वाढदिवस अत्यंत खास पद्धतीने साजरा केलाय. मात्र, लेकाच्या वाढदिवसाला हार्दिक पांड्या हा उपस्थित दिसत नाहीये.

नताशा आणि हार्दिका पांड्या यांच्या लेकाच्या वाढदिवसाचे काही फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. पहिल्या फोटोमध्ये अगस्त्य हा आपल्या कुटुंबियांसोबत केक कट करताना दिसत आहे. बाकी फोटोंमध्ये अगस्त्य याच्या वाढदिवसानिमित्त खास सजावट करण्यात आल्याचे बघायला मिळतंय.

आपल्या मित्र आणि मैत्रिणींसोबत अगस्त्यने वाढदिवस साजरा केलाय. मित्रांसोबत बर्थडे पार्टीमध्ये जेवण करतानाही अगस्त्य हा दिसतोय. आता हेच फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. हार्दिक आणि नताशा यांच्या घटस्फोटानंतर अगस्त्यचा हा पहिलाच बर्थडे आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यातील वाद टोक्याला गेल्याचे सांगितले जाते, यानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्याकडून हे अगोदरच स्पष्ट करण्यात आले की, घटस्फोटानंतर मुलाचा सांभाळ हे दोघे मिळून करणार आहेत. हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;