‘नवरी मिळे हिटलरला’ फेम लीलाचा प्राण्यांसाठी खास व्यवसाय; सेलिब्रिटीही देतात भेट
झी मराठी वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेला अल्पावधीतच खूप लोकप्रियता मिळाली. यामध्ये राकेश बापट आणि वल्लरी विराज यांच्या मुख्य भूमिका आहेत. अभिनयक्षेत्रात वल्लरी जरी नाव कमवत असली तरी याव्यतिरिक्त तिचा छोटा व्यवसाय आहे.
वल्लरीचं स्वत:चं पेट ग्रुमिंग सलून आहे. तिच्या या पेट ग्रुमिंग सलूनला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटीसुद्धा भेट देतात. 'बाथ अँड बार्क्स' असं तिच्या या पेट ग्रुमिंग सलूनचं नाव आहे.
मुंबईतल्या दादरमधील गोखले रोडवर वल्लरीचं हे सलून आहे. याठिकाणी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनीसुद्धा त्यांच्या पाळीव मांजरीसोबत भेट दिली होती. मांजरीच्या ग्रुमिंगसाठी त्या वल्लरीच्या सलूनमध्ये पोहोचल्या होत्या.
वल्लरीच्या या पेट ग्रुमिंग सलूनमध्ये प्राण्यांची अंघोळ, त्यांचे केस कापणे, नखं कापणे यांसारखी कामं केली जातात. वल्लरीने इन्स्टाग्रामवर यासाठी एक वेगळा पेज तयार केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List