‘लागीर झालं जी’ मालिकेपर्यंत आई धुण्याभांड्याची कामं करायची; किरण गायकवाडने सांगितली ती आठवण

‘लागीर झालं जी’ मालिकेपर्यंत आई धुण्याभांड्याची कामं करायची; किरण गायकवाडने सांगितली ती आठवण

झी मराठीवरील ‘लागीर झालं जी’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. मालिकेतील पात्र प्रेक्षकांना आपलीशी वाटत होती. या मालिकेतील पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या मालिकेतील युवराज देशमुख अर्थात भैय्यासाहेब देशमुख हे पात्रही प्रेक्षकांना आडायचं. अभिनेता किरण गायकवाड याने हे भैय्यासाहेब देशमुख पात्र साकारलं होतं. याच मालिकेच्या वेळच्या आठवणी किरणने शेअर केल्यात एका मुलाखतीदरम्यान किरण गायकवाडने या मालिकेवेळीची आठवण सांगितली आहे. तसंच ‘देवमाणूस’ मालिकेवेळी आई प्रचंड रडली होती, असंही किरण म्हणाला.

आई तेव्हा खूप रडली होती- किरण

माझी आई धुण्याभांड्याची कामं करायची अगदी ‘लागीर झालं जी’ मालिकेपर्यंत ती ते काम करत होती. पण मग मी तिला सांगितलं की आता नको करूस. मग आईने ते काम बंद केलं, असं किरण गायकवाड म्हणाला. ‘देवमाणूस’ ही मालिका सुरू होती. या मालिकेत व्हिलनचं कॅरेक्टर मी करत होतो. या पात्रावर लोकांनी प्रेमही केलं. तर काहींना ते पात्र नाही आवडायचं. तेव्हा लोक येऊन आईला सांगायचे की कसा आहे तो लोकांना किती त्रास देतो वगैरे… त्यावेळी आई खूप रडली होती. त्याचं मलाही खूप वाईट वाटलं. आजही त्या गोष्टीचं वाईट वाटतं, असं किरण गायकवाड म्हणाला.

“आईला सेटवर नेत नाही कारण…”

आईला मी कधीच कुठल्या सेटवर नेत नाही. मी ठरवलं आहे की जेव्हा मी पॉझिटिव्ह कॅरेक्टर करेन तेव्हा आईला मी सेटवर नेईन. निगेटिव्ह काम करत असताना मला तिला नाय न्यायचं सेटवर… डंका सिनेमाचं शुटिंग रात्री झालं. त्यामुळे तिला नेलं नव्हतं. पण मला आईचा खूप जास्त सपोर्ट आहे, असं किरणने सांगितलं.

मला फोनवर बोलायला फारसं आवडत नाही. हे आईला माहिती आहे. त्यामुळे ती मला फक्त कधी येणार आहेस? जेवणार आहेस का? एवढंच विचारायला फोन करते. बाकी आम्ही घरी असताना एकमेकांशी बोलतो, असं किरण गायकवाडने सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;