रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱयांना पोलीस उपअधीक्षकांचा हिसका, दुचाकी जप्त; कर्णकर्कश हॉर्न, सायलेन्सर तोडले, दोघांवर गुन्हा

रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱयांना पोलीस उपअधीक्षकांचा हिसका, दुचाकी जप्त; कर्णकर्कश हॉर्न, सायलेन्सर तोडले, दोघांवर गुन्हा

 मोठय़ा आवाजातील फटाके फोडणारे सायलेन्सर, कानठळ्या बसविणारे सायलेन्सर, चित्रविचित्र हॉर्न वाजवत रस्त्यावर स्टंटबाजी करत रस्त्याने ये-जा करणाऱया नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचविण्याची शक्यता निर्माण करणाऱ्या  हुल्लडबाजांवर संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी कारवाईचा हिसका दाखविला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी त्यांच्या दुचाकीचे कर्णकर्कश हॉर्न, सायलेन्सर तोडून टाकले.

संगमनेर शहरातील शासकीय विश्रामगृह ते अमृतवाहिनी कॉलेजपर्यंतच्या जुन्या मार्गावर सोमवारी दोघे स्टंटबाजी करत दुचाकी भरधाव वेगाने चालवित होते. याच दरम्यान या रस्त्यावरून जाणाऱया दक्ष नागरिकांनी या हुल्लडबाज, स्टंटबाजी करणाऱया तरुणांचे फोटोग्राफ्स, व्हिडीओ काढून संगमनेरचे पोलीस पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांना व्हॉट्सऍपवर पाठविले होते.

वाघचौरे यांनी हे व्हिडीओ फोटोग्राफ्स बघितल्यानंतर ताबडतोब दोन्ही दुचाकीस्वारांचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलीस नाईक राहुल डोके, राहुल सारबंदे, राजेश जगधने, पिचड आदी पोलीस कर्मचाऱयांनी काही वेळातच या दुचाकीस्वारांचा शोध घेत त्यांना पोलीस उपअधीक्षकांपुढे हजर केले. या हुल्लडबाज तरुणांकडील दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, कर्णकर्कश करणारे हॉर्न पोलिसांनी तोडून टाकले. तसेच एका दुचाकीचा मोठा आवाज करणारा सायलेन्सर मॉडिफाइड असल्यामुळे तोदेखील तोडून टाकला. याशिवाय दोन्ही दुचाकीस्वारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून प्रत्येकी अडीच हजारांचा दंड वसूल करण्यात आला. संगमनेरकर नागरिकांनी पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांच्या कारवाईचे स्वागत केले आहे. पोलिसांनी या कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

जर कोणी रस्त्यावर स्टंटबाजी करत असल्यास किंवा नियमबाह्य पद्धतीने सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज निर्माण करत असल्यास अशा गाडीचे व चालकाचे फोटो, व्हिडीओ पोलिसांना शेअर करावेत. पोलीस अशा स्टंटबाजांवर कारवाई करतील. – सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपअधीक्षक, संगमनेर-अकोले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;