सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील विनापरवाना 280 झाडे तोडली; मिळकतदारांना अडीच लाखांचा दंड, तिप्पट झाडे लावण्याचे आदेश

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील विनापरवाना 280 झाडे तोडली; मिळकतदारांना अडीच लाखांचा दंड, तिप्पट झाडे लावण्याचे आदेश

 व्याघ्र  प्रकल्पाच्या झालर (बफर झोन) क्षेत्रातील खासगी मालकीच्या दोन भूखंडातील 280 झाडांची विनापरवाना  तोड केल्याप्रकरणी वन्यजीव विभागाने तीन मिळकतदारांना एकूण अडीच लाख रुपये दंड ठोठावला. तोडलेल्या झाडांच्या तिप्पट संख्येने झाडे लाकून त्यांचे संगोपन करण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात आले आहेत.

प्रशांत रमेश डागा (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा), श्यामसुंदर गोवर्धन भंडारी (रा. संपदानगरी, सोमकार पेठ, पुणे) क गणेश दिनकर भोसले (रा. मुनाकळे, ता. जावली) या मिळकतदारांना स्वत:च्या मिळकतक्षेत्रात बेकादेशीर वृक्षतोड केल्याप्रकरणी वृक्ष अधिकारी तथा बामणोलीचे कनक्षेत्रपाल क्ही. डी. बाठे यांनी हा दंड केला आहे. बामलोणीचे  मुनाकळे (ता. जाकली) हे गाक सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या झालर क्षेत्रामध्ये मोडते. त्यामुळे हे बेकायदेशीर वृक्षतोडीचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले.

यातील मिळकतदार प्रशांत डागा क श्यामसुंदर भंडारी यांनी एक ते सात जूनच्या दरम्यान मुनाकळे गावात , स्व:ताच्या  भूखंडावरील झाडांची वन्यजीव किभागाकडून कोणतीही परवानगी न घेता तोड केली होती. या दोघांनी मिळून 210 झाडे तोडली असल्याचे वन्यजीव किभागाच्या पंचनाम्यात निष्पन्न झाले. वनाधिकाऱयांना दिलेल्या जबाबात प्रशांत डागा यांनी ही तोड विनापरवाना  केल्याची कबुली दिली होती. चौकशीअंती या दोघांना विनापरवाना तोडण्यात आलेल्या 210 झाड़ांसाठी, प्रत्येक झाडामागे 1 हजार याप्रमाणे एकूण दोन लाख दहा हजार रुपये दंड करण्यात आला. तसेच 630 झाडांची चालू पावसाळ्यात लागवड करण्याचा आदेश देण्यात आला.

याच गाकातील बेकायदेशीर कृक्षतोडीच्या दुसऱया प्रकरणामध्ये गणेश भोसले यांनी स्वत:च्या मालकी क्षेत्रातील 70 झाडांची दि. 1 ते 7 जून च्या दरम्यान याच पद्धतीने बेकायदेशीरवृक्षतोड केली. वनाधिकाऱयांनी केलेल्या पंचनाम्यात भोसले यांनीही बेकायदेशीर कृक्षतोड केल्याचा कबुली जबाब दिला आहे. त्यांना विनापरवाना तोडण्यात आलेल्या 70 झाडांसाठी, प्रती झाड 500 रुपये प्रमाणे एकूण 35 हजार रुपये दंड करण्यात आला. तसेच 210 झाडांची चालू पाकसाळ्यात लागकड करण्याचा आदेश दिला.

दोन्ही मिळकतींमधील तिन्ही मिळकतदारांना विनापरवाना तोडलेल्या झाडांच्या तिप्पट स्थानिक प्रजातींच्या झाडांची चालू पावसाळ्यामध्ये मालकी क्षेत्रात लागवड करावी . अन्यथा या झाडांची लागवड देखभाल व  त्यांच्या वाढीच्या खर्चाची रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात येईल. दंडाची रक्कम केळेत न भरल्यास दर साल दर शेकडा सहा टक्के व्याजाने  सर्व  रक्कम वसूल करण्यात येईल, असेही वनाधिकाऱयांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

मुनाकळे येथे घटनास्थळी शेकरी, कारस, चेर, जांभूळ, आळू, हिरडा, आटकी, आकळा, ऐन, चिंचोटा, सरशी, कुंभा, किंजळ, आसाना क आंबा अशा किकिध जातीच्या झाडांची जमिनीपासून एक ते दीड मीटर उंचीकर तोड करण्यात आली. तोड केलेली बहुतेक झाडे ही 15 ते 60 से. मी. काढीमध्ये आहेत. त्याचबरोबर करकंद, घाणेरी, रामेटा, चिमट, आबोळकी झुडपे क केलींचीही तोड केल्याचे दिसून आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;