‘तरंग शक्ती’ हवाई सराव ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये
देशातील सर्वात मोठा बहुराष्ट्रीय हवाई सराव ‘तरंग शक्ती’ ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये दोन टप्प्यांत होणार आहे. सरावाचा पहिला टप्पा 6 ते 14 ऑगस्टदरम्यान तामीळनाडूमधील सुलूर येथे आणि दुसरा टप्पा 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरदरम्यान जोधपूर येथे होणार आहे. जवळपास 30 देश यात सहभागी होणार आहेत. भारतीय हवाई दलाची तेजस, मिराज 2000 आणि राफेल विमाने या मेगा सरावात हिंदुस्थानच्या संरक्षण सामर्थ्याचे प्रात्यक्षिक दाखवतील. फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांची लढाऊ विमाने या सरावात सहभागी होत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List