Jalna News – 22 तलवारींसह सख्खे भाऊ पोलिसांच्या ताब्यात

Jalna News –  22 तलवारींसह सख्खे भाऊ पोलिसांच्या ताब्यात

पोस्ट पार्सलव्दारे जालना शहरात आलेल्या 22 तलवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल (31जुलै) जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आदित्य राजु काटकर व मंगेश राजु काटकर या सख्ख्या भावांना अटक केली आहे.

जालना जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बाळगणार्‍या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून विशेष मोहिम राबविण्यात आली होती. या दरम्यान जालना शहरात आदित्य राजू काटकर याने पोस्टाद्वारे काही तलवारी मागवल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी साफळा रचला आणि आरोपी आदित्य काटकर आणि मंगेश काटकर पोस्टाबाहेर येताच त्यांना ताब्यात घेतले. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, सदर तलवारी या अमृतसर येथून शस्त्रविक्रीच्या दुकानातून मागवल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणी 44 हजार रुपयांच्या 22 तलवारी जप्त केल्या आहेत. तसेच आरोपी आदित्य राजू काटकर आणि त्याचा सख्खा भाऊ मंगेश राजू काटकर याला ताब्यात घेतले

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, चाग्रे, पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत, भाऊराव गायके, रमेश राठोड, विजय डिक्कर, रुस्तुम जैवाळ, प्रशांत लोखंडे, सागर बावीस्कर, संभाजी तनपुरे, देविदास भोजणे, संदीप चिंचोले, सचिन राऊत, रवि जाधव, भागवत खरात, किशोर पुंगळे, धिरज भोसले आणि सौरभ मुळे यांनी केलेली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;