नवीन वकिलांच्या नोंदणीसाठी जास्तीचे शुल्क न आकारण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवीन वकिलांच्या नोंदणीसाठी जास्तीचे शुल्क न आकारण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवीन वकिलांच्या नोंदणीसाठी विविध राज्यातील बार कौन्सिलच्या वेगवेगळ्या शुल्क आकारणीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. त्यात अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टस 1961 नुसार वकिलांच्या नाव नोंदणीसाठी 750 रुपयेच शुल्क आहे. जास्तीचे शुल्क आकारण्यात येवु नये असे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी दिले.

विविध राज्य बार कौन्सिल व इंडियन बार कौन्सिल मध्ये वकिलाच्या नोंदणीसाठी जास्तीचे शुल्क आकारण्यात येत होते. त्याविरुध्द नविन नोंदणीकृत वकिलांनी वेगवेगळ्या राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या. त्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठामध्ये अ‍ॅड. चंद्रहास बोडखे यांनी अ‍ॅड. अक्षय बडे यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती.

विविध उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने सर्वच दहा याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग केल्या होत्या. त्यावर एकत्रित सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर राज्य बार कौन्सिल (एसबीसी) आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया (बी. सी.आय) यांनी अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टस कलम २४ नुसार ठरवुन दिलेल्या वित्तीय धोरणात बदल किंवा सुधारणा करु शकत नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.

असे होते शुल्क

ओरिसामध्ये 42100, गुजरातमध्ये 25000 उत्तराखंडमध्ये 23650 , झारखंडमध्ये 21460, केरळमध्ये 20500, महाराष्ट्रात सर्व सामान्य वकिलास 15500 व पेन्शनधारक तसेच वय 50 वर्षे किंवा त्यापुढील व्यक्तींना अतिरिक्त 25000 हजार रुपये शुल्क आकारण्यात येत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;