राज्याच्या राजकारणात खालच्या थरावर जाऊन एकमेकांवर चिखलफेक सुरू; सत्ताधाऱ्यांवर वडेट्टीवारांची सडकून टीका

राज्याच्या राजकारणात खालच्या थरावर जाऊन एकमेकांवर चिखलफेक सुरू; सत्ताधाऱ्यांवर वडेट्टीवारांची सडकून टीका

गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी महायुतीवर सडकून टीका केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया माध्यम X वर ट्वीट करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. “खालच्या थरावर जाऊन एकमेकांवर चिखलफेक करण्याचे काम मागील एका आठवड्यापासून राज्याच्या राजकारणात पुन्हा सुरू झाले आहे. आरोप, प्रत्यारोप आणि उणीदुणी सार्वजनिकरित्या काढून महायुतीतील सत्ताधारी नेते मुद्दाम नवीन वादाला तोंड फोडत आहे. ह्यात महाराष्ट्राच्या मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून सत्ताधारी आपले डाव साधून घेत आहे.” अस म्हणत महाराष्ट्रातील मुख्य प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी अधोरेखीत केले.

“प्रत्येक शासकीय विभागात वाढलेला भ्रष्टाचार, रोज कोट्यवधी रुपयांचे शासन निर्णय काढून तिजोरीची सुरू असलेली लूट, वाढलेली कमिशनखोरी, शेतकऱ्यांच्या पिकाला न मिळालेला हमीभाव, महिलांवर होणारे हल्ले, बेरोजगारी हे सर्व प्रश्न दुर्लक्षित होत आहेत. सत्ताधाऱ्यांचा हा तमाशा आपल्या राज्याच्या संस्कृतीला शोभून देखील दिसत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी नेहमी महाराष्ट्राला बदनाम करून महायुतीतील सत्ताधाऱ्यांनी नेहमीच स्वतःचा फायदा करून घेतला आहे… आता ही तोच डाव आहे.” अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;