फिरण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू, मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आई-मुलीही बुडाल्या
मध्य प्रदेशातील खरगौन येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नर्मदा नदीमध्ये बुडून एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. बुडलेल्यांमध्ये आई-मुलासह मुलीचा समावेश आहे.
इंदूरचा अरविंदो सांवेर रोड ई-सेक्टरमध्ये राहणारे राजपूत कुटुंब महेश्वर फिरण्यासाठी आले होते. बुधवारी सकाळी साधारण 11 वाजता सर्व महेश्वर पोहोचल्यानंतर एकांत मंडाल खोर घाटात नर्मदा नदीत आंघोळीसाठी गेले होते. याच दरम्यान 18 वर्षीय विक्रम राजपूत नावाचा तरूण बुडायला लागला. तो बुडत असल्याचे पाहून त्याची आई उर्मिला राजपूत (45) आणि बहिण मोहीनी (25) हात पकडून त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत होती. मात्र त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात तिघंही खोल पाण्यात पोहोचले आणि पोहता येत नसल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आई-मुलीचा मृतदेह सापडला असून मृतदेह महेश्वर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मुलाचा शोध सुरु आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List