राजकुमार रावच्या प्लास्टिक सर्जरीच्या चर्चांवर इमरान हाश्मी हे काय बोलून गेला..
दमदार अभिनयकौशल्यासाठी ओळखला जाणारा अभिनेता राजकुमार राव काही दिवसांपूर्वी त्याच्या बदललेल्या लूकमुळे चर्चेत होता. राजकुमारने प्लास्टिक सर्जरी केली का, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला होता. बदललेल्या लूकवरून राजकुमारला बरंच ट्रोलसुद्धा करण्यात आलं होतं. त्यावर आता अभिनेता इमरान हाश्मीने प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इमरानला कलाकारांच्या प्लास्टिक सर्जरीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. “कलाकार प्लास्टिक सर्जरीचा पर्याय का निवडतात? दिसण्याबाबतची असुरक्षितता कुठून निर्माण होते”, असा प्रश्न इमरानला विचारण्यात आला होता. त्यावर त्याने दिलेल्या उत्तराची चर्चा होत आहे.
प्लास्टिक सर्जरीबद्दल प्रश्न विचारल्यानंतर इमरानने मुलाखत घेणाऱ्याला सर्जरी केलेल्या एखाद्या कलाकाराचं नाव घेण्यास सांगितलं. जेव्हा राजकुमारचं नवा घेतलं गेलं, तेव्हा इमरान म्हणाला, “होय, ही रिॲलिटी आहे. मी इथे कॉस्मेटिक बिझनेसविषयी बोलतोय. हे फक्त इंडस्ट्रीतच नाही तर त्यांनी या गोष्टीचं मार्केटिंग खूप चांगल्या प्रकारे केलंय. प्रत्येकाला पोस्टर बॉय किंवा पोस्टर गर्लसारखं दिसायचं आहे. सौंदर्य म्हणजे काय, याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे, बरोबर ना? आणि म्हणूनच तुम्हाला त्या साच्यात स्वत:ला बसवायचं असतं. कारण त्यामुळे तुम्हाला इतरांकडून प्रेम मिळतं आणि तुम्हाला स्वत:बद्दल चांगलं वाटू लागतं. कॉस्मेटिक सर्जरीबद्दल बोलायचं झाल्यास, मी अद्याप ते केलेलं नाही.”
New Transgender in Town, #RajkummarRao did Plastic Surgery of his Face & spent whopping 70 Lac on his Face ! Look at his Girlish Face ! BC bus yehi daikna Rah gaya tha. pic.twitter.com/SttjV0FVyT
— Umair Sandhu (@UmairSandu) April 14, 2024
राजकुमार रावने ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत प्लास्टिक सर्जरी केल्याच्या चर्चा फेटाळल्या होत्या. “मी कोणत्याच प्रकारची प्लास्टिक सर्जरी केली नव्हती. तो फोटो जर तुम्ही पुन्हा पाहिलात, तर तुमच्या लक्षात येईल की काय फरक आहे? गेल्या 14 वर्षांत तोच एक फोटो इतका वेगळा कसा काय आहे? दुसरा कोणताच फोटो तसा नाही. माझ्या मते तो फोटो एडिट केलेला असावा, कारण त्यात माझी त्वचा एकदम नितळ दिसतेय. ते पाहून मी सुद्धा थक्क झालो होतो की माझी त्वचा इतकी नितळ कशी काय दिसू शकते? तेसुद्धा कोणत्याही मेकअपशिवाय आणि दिवसभर शूटिंग करूनही”, असं तो म्हणाला होता.
याच मुलाखतीत राजकुमारने काही वर्षांपूर्वी फिलर्स केल्याची कबुली दिली होती. “जवळपास आठ ते नऊ वर्षांपूर्वी मी हनुवटीजवळ फिलर्स केले होते. कारण त्यावेळी मला कॉन्फीडन्ट दिसायचं होतं आणि माझ्या डर्मेटोलॉजिस्टने मला तसा सल्ला दिला होता. त्यावेळी मी चेहऱ्यावर थोडं फिलर वर्क केलं होतं. पण त्यानंतर मी काहीच केलं नाही”, असंही त्याने स्पष्ट केलं होतं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List