Rajasthan Accident: चुरू येथे विद्यार्थ्यांची पिकअप व्हॅन पलटली, विद्यार्थ्यासह दोघांचा मृत्यू; 28 विद्यार्थी जखमी

Rajasthan Accident: चुरू येथे विद्यार्थ्यांची पिकअप व्हॅन पलटली, विद्यार्थ्यासह दोघांचा मृत्यू; 28 विद्यार्थी जखमी

राजस्थानच्या चुरु जिल्ह्यामध्ये बुधवारी शाळकरी विद्यार्थ्यांची पिकअप व्हॅन पलटून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या अपघातात एका मुलासहीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28 विद्यार्थी जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्ण मीणा (50) आणि आदित्य (12) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी पुढे सांगितले की, साहवा येथील मेघसरहून झाडसर गजिया रोडवरुन शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली पिकअप वाहन पलटून एका मुलासहीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28 मुलं जखमी झाले आहेत.

जखमी 20 मुलांना तारानगर उपजिल्हा रुग्णालयात, पाच मुलांना खासगी रूग्णालयात, एका मुलाला साहवा येथे आणि गंभीर जखमी झालेल्या एका मुलाला जयपुर येथे हलविण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, मृतदेहांना शवविच्छेदन अहवालासाठी रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आले आहे आणि पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;