सलमानचा भ्या वाटतंय, मी त्याला… अभिनेत्रीला नेमकं काय म्हणायचंय ?

सलमानचा भ्या वाटतंय, मी त्याला… अभिनेत्रीला नेमकं काय म्हणायचंय ?

बॉलीवूडमधील अभिनेत्री झरीन खान हिने अभिनेता सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘वीर’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने एका राजकुमारीची भूमिका साकारली होती. ‘वीर’ चित्रपटामुळे झरीन रातोरात स्टार बनली. अभिनेत्री कतरिना कैफच्या चेहऱ्याशी साधर्म्य असल्यामुळेही झरीन खूपच लोकप्रिय झाली होती. मात्र नंतर ती फारशी चमक दाखवू शकली नाही. तिने नुकताच अभिनेता सलमान खानबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. ज्याच्यासोबत चित्रपटात काम केलं, त्याच सलमानची तिला अजूनही भीती वाटते, असं झरीनने नमूद केलं, तेव्हाही आणि आताही.. एवढंच नव्हे तर चित्रपटाच्या सेटवर झरीन कायम सलमानला बघत बसायची, त्याला स्टेअर करायची, अशी आठवणही तिने सांगितली.

सलमानची वाटायची भीती

कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्याशी बोलताना झरीन अनेक विषयांवर व्यक्त झाली. सलमानच्या आसपास असणं अनेकदा भीतीदायक वाटायचं असं ती म्हणाली. “सलमानसोबत असताना नेहमी ती भीती वाटते. पण तो इतका चांगला माणूस आहे की त्याने मला तसं कधी (भीती) वाटू दिली नाही, शूटिंग दरम्यान मी त्याच्या आसपास असायचे. दोन शॉट्सदरम्यान , आराम करताना, तो ( सलमान) त्याच्या क्रू सोबत व्हॅनिटीबाहेर बसायचा आणि मी सुद्धा त्यांच्यासोबतच तेथे बसायचे ” अशी आठवण झरीनने सांगितली.

सलमानला स्टेअर करायची

व्हॅनिटी बाहेर बसून मी सलमानलाच बघायचे, त्याचं निरीक्षण करायचे, असंही ती म्हणाली. “सलमान त्याचे काम करायचा आणि मी त्याच्याकडे पाहत बसायचे. मध्येच तो मला विचारायचा ‘काय झाले?’ आणि मी म्हणायचे की ‘मी तुझ्यासमोर बसले आहे यावर माझा विश्वासच बसत नाही, मी तुला फक्त चित्रपटांमध्ये पाहिलं. माझं संपूर्ण कुटुंब तुझं चाहतं आहे’ असं मी त्याला सांगायचे, असेही झरीनने नमूद केलं.

दबंग स्टारचा पाठलागही केला

“वीर” या पहिल्या चित्रपटापासूनच प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या झरीनने ती सलमानची खूप मोठी फॅन असल्याचाही खुलासा केला. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी ती सलमानचा पाठलाग करायची. तो कार्टर रोडवर सायकल चालवायचा तेव्हा मी त्याचा पाठलाग करायचे. मी तेव्हा कॉलेजमध्ये होते. त्याच्या तर ही गोष्ट लक्षातही नसेल, कारण तेव्हा मी आत्तापेक्षा डबल साईजची होते, अशी आठवणही झरीनने सांगितली.

2021 साली प्रदर्शित झालेल्या ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ मध्ये झरीन खान शेवटची दिसली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;