वर्षा उसगांवकर-निक्की तांबोळी यांच्यातील भांडणावर मराठी कलाकाराची टिप्पणी; म्हणाला..

वर्षा उसगांवकर-निक्की तांबोळी यांच्यातील भांडणावर मराठी कलाकाराची टिप्पणी; म्हणाला..

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘बिग बॉस मराठी’चा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अगदी पहिल्या दिवसापासूनच या शोमध्ये नवनवीन ड्रामे आणि भांडणं पहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचंही भरभरून मनोरंजन होतंय. बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळी यांच्यात वादाची ठिणगी पडली. हा वाद पुढील भागात आणखी वाढला. आता नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये वर्षा आणि निक्की यांच्यात टोकाचे वाद झाल्याचं पहायला मिळालं. दोघींमधील हा वाद सोशल मीडियावर चांगलाच गाजत असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताच स्पर्धकांसमोर विविध आव्हानं उभी राहिली आहेत. यावेळी घरातील प्रत्येक सदस्याला बीबी करन्सी खर्च करून सामान विकत घ्यावं लागतंय. त्यातच बेड खरेदी न केल्याने बिग बॉसने सर्वांना जमिनीवर झोपावं लागेल असे आदेश दिले. तसंच घरात दिवसभर कोणीही बेडचा वापर करू नये, असंही सांगण्यात आलं होतं. तरीही काही स्पर्धकांकडून या नियमाचा भंग झाला आणि त्याचीच शिक्षा म्हणून बिग बॉसने संपूर्ण आठवडाभार बेडचा वापर करायचा नाही, अशी शिक्षा सुनावली आहे. यावरून निक्की वर्षा यांच्यावर भडकते. “तुमच्यामुळे आम्हाला भोगावं लागतंय. तुम्ही बाहेर खूप मोठ्या असाल पण घरात सगळेच सारखे आहेत”, अशा शब्दांत ती उसगांवकर यांना सुनावते. त्यानंतर वर्षासुद्धा तिला प्रत्युत्तर देतात. दोघांमधील ही बाचाबाची वाढतच जाते आणि नंतर दोघीही रडू लागतात.

उत्कर्ष शिंदेची पोस्ट

वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळी यांच्यात झालेल्या या भांडणावरून आता ‘बिग बॉस मराठी’च्या माजी स्पर्धकाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. हा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून उत्कर्ष शिंदे आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये वर्षा आणि निक्की यांचा फोटो शेअर करत लिहिलंय, ‘आलिया भोगासी असावे सादर!’ बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळीचं विविध स्पर्धकांशी सतत भांडणं होत आहेत. नॉमिनेशनच्या टास्कदरम्यान निक्कीचं ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर हिच्यासोबतही भांडण होतं. यानंतर अंकिता एका कोपऱ्यात जाऊन रडत बसते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;