उरणनंतर पिंपरी चिंचवडमध्ये प्रेमाचा खूनी खेळ, नकार दिला म्हणून तरुणीला भोसकले!

उरणनंतर पिंपरी चिंचवडमध्ये प्रेमाचा खूनी खेळ, नकार दिला म्हणून तरुणीला भोसकले!

उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांडाची घटना ताजी असतानाच पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिला म्हणून 22 वर्षाच्या तरुणाने 21 वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. घटनेच्या 12 तासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अविराज खराट असे आरोपीचे नाव आहे. पोलीस आरोपीची सखोल चौकशी करत आहेत.

‘आजतक’ने दिलेल्या माहितीनुसार, खेड येथील रहिवासी असलेली प्राची माने आणि अविराज खराट एकमेकांना आधीपासून ओळखत होते. दोघेही आधी सांगली येथे राहत होते. काही दिवसांपूर्वी अविराजने प्राचीला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. मात्र प्राचीने अविराजचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला. यामुळे अविराजच्या मनात खदखद होती. याच रागातून अविराजने प्राचीवर चाकूने वार करुन तिची हत्या केली.

हत्या केल्यानंतर आरोपी सातारा येथे पळून गेला. मात्र पोलिसांनी कसून शोध घेत 12 तासात आरोपीला अटक केली आहे. आरोपी साताऱ्यातून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अविराज विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;