BB Marathi: कोकण हार्टेड गर्लसोबत निक्कीचं कडाक्याचं भांडण; कोण जाणार घराबाहेर?

BB Marathi: कोकण हार्टेड गर्लसोबत निक्कीचं कडाक्याचं भांडण; कोण जाणार घराबाहेर?

छोट्या पडद्यावरील अत्यंत वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ला नुकतीच सुरुवात झाली आहे. यंदाच्या सिझनचं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख करत असून घरातील स्पर्धकांनी शोची उत्सुकता वाढवली आहे. यंदा बरेच सोशल मीडिया स्टार बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. बिग बॉस हा शो त्यातील टास्कशिवाय अपूर्ण आहे. स्पर्धकांना घरात टिकून राहण्यासाठी हुशारीने टास्क खेळावेच लागतात. प्रीमियरपासूनच ‘बिग बॉस’ स्पर्धकांना पेचात पाडत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनमध्ये पहिल्या एपिसोडपासून भांडण, राडे, धमाल, मजा-मस्ती हे सर्व पहायला मिळत असून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन होत आहे. ‘बिग बॉस मराठी’ सुरू होऊन चार दिवस पूर्ण झाले असून चौथ्या दिवशीच घरात पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनमध्ये आज नॉमिनेशन कार्याचा शुभारंभ होणार आहे. याबाबतचा प्रोमोदेखील सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. ‘नॉमिनेशनची तोफ’ असं या पहिल्या नॉमिनेशन कार्याचं नाव आहे. प्रतिस्पर्ध्याला घराबाहेर काढण्यासाठी ‘बिग बॉस’ने ‘नॉमिनेशन तोफ’ या कार्याचा अवलंब केला आहे. पहिल्याच कार्यादरम्यान ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

टास्कसाठी भिडताना अंकिता आणि निक्कीमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाचीदेखील झालेली पाहायला मिळेल. राड्यादरम्यान हे दोन सदस्य टास्क कसा पूर्ण करणार हे पाहणं मनोरंजक ठरेल. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनमध्ये पहिल्या आठवड्यात कोणते सदस्य सुरक्षित होणार आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. एक घर, 100 दिवस आणि 16 स्पर्धकांचा प्रवास आता सुरू झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळत आहे.

या नव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण यांनी भाग घेतला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;