बालमैत्रिणीच्या नोकरीची पार्टी करायला आला; पण दारुच्या नशेत भलतंच करुन बसला!

बालमैत्रिणीच्या नोकरीची पार्टी करायला आला; पण दारुच्या नशेत भलतंच करुन बसला!

नवीन नोकरी लागल्यानिमित्त पार्टीसाठी बोलावणाऱ्या बालमैत्रिणीवरच मित्राने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हैदराबाद शहरात वनस्थलीपुरम परिसरात एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेचा मित्र आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पीडित तरुणी सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तिला नुकतीच नवीन नोकरी लागली होती. नवी नोकरी लागल्याचा आनंद साजरा करण्यासाठी सोमवारी संध्याकाळी तिने आपल्या बालमित्राला बोलावले. दोघंही हैदराबाद शहरातील वनस्थलीपुरम येथे एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये भेटले.

रेस्टॉरंटमध्ये दोघांनी पार्टीदरम्यान मद्यप्राशन केले. त्यानंतर दोघे रेस्टॉरंटमधील रुममध्ये गेले. तेथे दारुच्या नशेत मित्राने पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर काही वेळाने त्याचा चुलत भाऊ खोलीत आला आणि त्यानेही पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर दोघेही भाऊ तिथून पसार झाले.

पीडितेने आपल्या भावाला फोन करुन सर्व आपबीती सांगितली. त्यानंतर तरुणीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;