केसांना खूप जपणाऱ्या हिना खानला अखेर करावं लागलं टक्कल; नेटकरी म्हणाले ‘खूप हिंमत..’

केसांना खूप जपणाऱ्या हिना खानला अखेर करावं लागलं टक्कल; नेटकरी म्हणाले ‘खूप हिंमत..’

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. कर्करोग निदान झाल्यापासून त्यावर विविध उपचार घेण्यापर्यंतची प्रत्येक अपडेट ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करतेय. त्याचप्रमाणे या कठीण परिस्थितीला ती कशी सामोरं जातेय, हे दाखवत इतरांनाही प्रेरणा देतेय. हिनाला तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोग्याशी संबंधित अनेक आव्हानं झेलत ती खंबीरपणे उपचारांना सामोरी जातेय. ज्या परिस्थितीत अनेकजण खचून जातात किंवा आशा गमावून बसतात, अशा स्थितीत हिना अत्यंत सकारात्मकपणे सर्व काही सहन करताना दिसतेय. कॅन्सरवरील उपचार सुरू असताना हिनाने तिचे केस कापले होते. आता किमोथेरेपी सुरू असताना तिने पूर्णपणे टक्कल केलंय.

हिनाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिच्या डोक्यावर टोपी दिसत आहे. तिने तिच्या डोक्यावरील सर्व केस कापले असून टक्कल केलं आहे. अशा स्थितीतही ती चेहऱ्यावर हास्य ठेवून एका स्किनकेअर ब्रँडचं प्रमोशन करताना दिसतेय. हिनाच्या या व्हिडीओवर टीव्ही इंडस्ट्रीतील विविध सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव होतोय. अभिनेता नकुल मेहताने तिला ‘चॅम्पियन’ असं म्हटलंय. तर दुसऱ्या युजरने ‘सिंहीण’ असं लिहिलं आहे.

हिना सध्या कर्करोगावरील उपचार घेत आहे. सर्जरीनंतर तिच्यावर किमोथेरेपी सुरू आहे. पहिल्या किमोनंतर हिनाच्या शरीरावर काही डागसुद्धा दिसून आले. याविषयी नेटकऱ्यांनी काळजी व्यक्त केली. मात्र सकारात्मक विचार डोक्यात ठेवून या सर्व गोष्टींना सामोरं जात असल्याचं हिनाने चाहत्यांना सांगितलं आहे. किमोथेरेपी सुरू करण्यापूर्वी हिनाने तिचे केससुद्धा कापले. किमोथेरेपीमुळे केस गळतात. त्यामुळे आधीच हिंमत दाखवत हिनाने तिचे केस छोटे केले. त्याचा व्हिडीओसुद्धा तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हिनाला पाहून तिची आई भावूक झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;