‘वंदे भारत’मध्ये जेवणावरून प्रवासी-वेटर भिडले! ‘व्हेज’ऐवजी ‘नॉनव्हेज’ जेवण दिल्याने मारहाण

‘वंदे भारत’मध्ये जेवणावरून प्रवासी-वेटर भिडले! ‘व्हेज’ऐवजी ‘नॉनव्हेज’ जेवण दिल्याने मारहाण

ट्रेनमध्ये जेवणावरून होणारे वाद काही नवीन नाहीत. रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये अनेकदा भांडणे होतात. मात्र यावेळी जरा वेगळंच घडलंय. कारण रेल्वे कर्मचाऱयाच्या पाठीशी खुद्द प्रवासी उभे राहिल्याचे दिसून येतंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झालं असं की, एका वृद्धाने ‘वंदे भारत’ ट्रेनने प्रवास करताना जेवण ऑर्डर केले होते. त्याने शाकाहारी जेवणाची ऑर्डर दिली होती. पण वेटरने चुकून मांसाहारी जेवण आणून दिले. त्यामुळे तो वृद्ध भडकला आणि त्याने रागाच्या भरात त्या वेटरला दोन सणसणीत थोबाडीत मारल्या. वेटर माफी मागून शाकाहारी जेवण आणून देतो असे म्हणत होता. पण चूक मान्य केल्यानंतरही ती वृद्ध व्यक्ती ऐकायला तयार होईना. उलट वृद्धाने अपशब्द उच्चारून मारहाणीला सुरुवात केली. तुम्ही गरीब माणसाला कसे मारता, असा सवाल अन्य प्रवाशांनी केला. अखेर बाजूचे प्रवाशी त्या वेटरच्या मदतीला धावले. डब्यातली जवळपास सर्वच लोपं आपल्या विरोधात उभी आहेत हे लक्षात आल्यानंतर तो वृद्ध प्रवासी घाबरला आणि त्याने वेटरची माफी मागितली.

– रेल्वेमध्ये वेटरला मारहाण केल्याचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटिजन्स वेटरची बाजू घेताना दिसत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;