बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला ओळखलंत का? आधी शाळेमध्ये होती शिक्षिका

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला ओळखलंत का? आधी शाळेमध्ये होती शिक्षिका

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी कधीही या क्षेत्रात येण्याचा विचार देखील केला नव्हता. पण नंतर जेव्हा त्यांना या क्षेत्रात पाऊल ठेवलं तेव्हापासून त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आणि प्रेक्षकांच्या मनात घर केले. या सेलिब्रिटींचे अनेक फोटो सोशल मीड्यावर व्हायरल होत असतात. सेलिब्रिटी आपल्या काही लहानपणीच्या आठवणी देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशीच एक अभिनेत्री आहे. जिने तिचा लहानपणीचा फोेटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली पुढे जाऊन बॉलिवूडची अभिनेत्री बनली आहे.

कियारा अडवाणी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ३१ जुलै रोजी ती ३३ वा वाढदिवस साजरा करणार आहे. तिने फार कमी वेळात इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाच्या जोरावर ती लोकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. कियारा अडवाणी जवळपास एक दशकापासून बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. अभिनेत्री बनण्यापूर्वी ती काय करत होती. तिचे नेट वर्थ काय आहे. याबाबत ही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कियारा अडवाणीचे खरे नावही अनेकांना माहित नसेल. ते देखील आम्ही सांगणार आहोत.

कियारा अडवाणीचे खरे नाव आलिया अडवाणी आहे. ही गोष्ट खूपच कमी लोकांना माहितीये. सलमान खानच्या सांगण्यावरुन तिने आपल्या नावात बदल केल्याचं बोललं जातं. कारण आलिया या नावाने आलिया भट्ट हिने आधीच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यामुळेच कियारा अडवाणीने तिचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. कियारा अडवाणी आज एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण अभिनेत्री बनण्याआधी ती एक शाळेतील मुलांना शिकवण्यासाठी जात होती. असंही म्हटलं जातं की ती मुंबईच्या अर्ली बर्ड प्ले स्कूलमध्ये मुलांना शिकवायची. नंतर तिने बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

कियारा अडवाणीने 12वीत असतानाच अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं. 2009 मध्ये 3 इडियट्स चित्रपट पाहिल्यानंतर तिने वडिलांना तिला अभिनेत्री बनायचे असल्याचे सांगितले होते. कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितले की, “जेव्हा मी 12वीत होते, तेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितले की मला अभिनेत्री बनायचं आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)


कियारा अडवाणी पुढे म्हणाली होती की, “माझ्या वडिलांना आधीच माहित होते की माझ्यात अभिनयाचा दोष आहे आणि मी ते करू शकते.” यानंतर कियारा अडवाणीने 2014 मध्ये रिलीज झालेल्या फुगली चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर ती जुग जुग जिओ आणि गुड न्यूज सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. द फायनान्शिअल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, कियारा अडवाणीची सध्या नेटवर्थ 40 कोटी रुपये आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ती ब्रँड एंडोर्समेंटमधूनही चांगली कमाई करते. कियारा अडवाणी एका चित्रपटासाठी ३ कोटी रुपये मानधन घेते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;