अलंकापुरीत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे नामजयघोषात आगमन

अलंकापुरीत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे नामजयघोषात आगमन

आषाढी पायी वारी पालखी सोहळ्या अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे परंपरेने माऊली मंदिरात हरिनाम गजरात आगमन झाले. हजारो वारकरी भाविकांचे उपस्थितीत सोहळा हरिनाम गजरात आळंदीत परतला. यावर्षी लाखो भाविकांचे उपस्थितीत पायी वारी सोहळा राज्यात साजरा करण्यात आला. पंढरीत श्रीविठ्ठल देव भेट, गोपाळपूर काला उरकून श्रींचे वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे हजारो भाविक, वारकरी, नागरिकांच्या उपस्थितीत हरीनाम जयघोषात सोहळा मंगळवारी ( दि. 30 ) अलंकापुरीत गोरज मुहूर्तावर सव्वा सहाचे दरम्यान आळंदीत प्रवेशाला. परंपरेने बुधवारी ( दि. 31 ) आळंदीत आषाढी एकादशी सोहळा हरिनाम गजरात साजरा होत आहे.

ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे परंपरेने आळंदी मंदिरात पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, ऋषिकेश आरफळकर यांचे प्रमुख उपस्थितीत श्रींचे पादुका आळंदी देवस्थानकडे वारीहून आल्यानंतर परंपरेने सुपूर्द करण्यात आल्या. श्रींचे पादुका पालखी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर विना मंडपातून माऊलींचे मंदिरात सोहळा आरतीने विसावला. तत्पूर्वी माऊली मंदिरातून श्रींचे स्वागत प्रथा परंपरेने दिंडी हरिनाम गजरात पालखी सोहळ्यास सामोरी जात महानैवेद्य झाला. अभंग हरिनाम गजरात सोहळ्याचे स्वागत व आगमन झाले. वारकरी शिक्षण संस्था मधील साधकांनी सोहळा आळंदीत प्रवेश प्रसंगी हरिनाम गजरात नाम जयघोष केला. पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, प्रमुख विश्वस्त अँड. राजेंद्र उमाप, भावार्थ देखणे, वेदमूर्ती हंसराज चक्रांकित, व्यवस्थापक माऊली वीर, मानकरी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, योगीराज कु-हाडे, योगेश आरु, विठ्ठल घुंडरे, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे चोपदार, उद्धव रणदिवे चोपदार, ज्ञानेश्वर गुळुंजकर, संजय रणदिवे, तुकाराम माने, भीमराव घुंडरे, नगारखाना सेवक मानकरी बाळासाहेब भोसले, समीर घुंडरे, विनायक घुंडरे, सचिन कुऱ्हाडे, महेश केदारी, महादेव रत्नपारखी यांचे सह मानकरी, दिंडीकरी, वारकरी भाविक उपस्थित होते. आळंदी मंदिरात ज्ञानेश्वर महाराज यांचे वैभवी पादुका आल्यानंतर श्रींचे संजीवन समाधी मंदिरात आरती झाली. देवस्थान तर्फे मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला. आळंदीत पालखी सोहळ्याचे स्वागतास भाविकांनी रस्त्याचे कडेला दुतर्फा उभे राहून गर्दी करीत हरिनाम जयघोषात स्वागत केले. यावर्षी पालखी सोहळ्यावर कोणतेही निर्बंध नसल्याने सोहळा मोठ्या आनंदी उत्साही मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.परंपरेने दिंडीने सामोरे जात सोहळ्याचे आळंदीत जुन्या पुला पलीकडे नैवेद्य, आरती झाली. यावेळी वरुणराजाने हलकासा शिडकावा केला. आळंदी पंचक्रोशीतून भाविक, नागरिक श्रींचे सोहळ्याचे स्वागतास मोठ्या संख्येने आले होते.

आळंदी सोहळ्यात पोलिस मित्रांचे कौतुक

आळंदीतील पोलिस मित्र युवा महासंघ,पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन यांचे पदाधिकारी शिवाजी जाधव, योगेश जाधव, प्रवीण बोबडे, ज्योती पाटील, किरण कोल्हे, बाबासाहेब भंडारी, वैभव दहिफळे आदींनी आषाढी वारीत बंदोबस्तासाठी सेवा व मदत कार्य करीत पोलीस प्रशासनास सहकार्य केले. पोलिस मित्र परीवाराने केलेल्या सेवा कार्याचे कौतुक पोलीस प्रशासनाने केले आहे. आळंदी परिसरात पोलीस मित्र सेवा यावर्षी हि प्रभावी देण्यात आली. संवाद साधून पोलीस प्रशासनास सहकार्य केल्याने पोलीस मित्रांची भेट घेऊन पोलीस प्रशासनाने संवाद साधला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;