जातीनिहाय जनगणनेसाठी मला कितीही शिव्याशाप ऐकावे लागले तरी चालतील; अनुराग ठाकूर यांना राहुल गांधींचे सडेतोड प्रत्युत्तर

जातीनिहाय जनगणनेसाठी मला कितीही शिव्याशाप ऐकावे लागले तरी चालतील; अनुराग ठाकूर यांना राहुल गांधींचे सडेतोड प्रत्युत्तर

संसदेच्या अधिकवेशनात विरोधी पक्षांचा आवाज दिसत आहे. राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरील भाषणात सत्ताधाऱ्यांना चांगलेच फोडून काढले होते. तशीच जातीनिहाय जनगणेनेची मागणीही केली होती. देशातील जनता चक्रव्यूहात अडकली असून सत्ताधारी भाजप त्यांच्या पाठीवर आणि छातीत खंजीर खुपसत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते. या मुद्द्यावरून भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. त्याला राहुल गांधी यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी एनडीए आणि इंडिया आघाडीत अनेक मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी होत आहे. लोकसभेमध्ये मंगळवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्यात खंडाजंगी झाली. अनुराग ठाकूर यांनी मला शिविगाळ केली, माझा अपमान केला, मात्र मला यांच्याकडून माफीही नको आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी ठाकूर यांना फटकारले.

LoP चा अर्थ लीडर ऑफ अपोझिशन असा होतो. लीडर ऑफ प्रोपेगेंडा नाही, हे राहुल गांधी यांना माहिती असले पाहिजे, असे अनुराग ठाकूर म्हणाले. काँग्रेसने सत्तेवर असताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे, असा आरोपही ठाकूर यांनी केला. ज्याच्या जातीचा पत्ता नाही, तो जातीनिहाय जनगणनेची मागणी करत आहे, असे वादग्रस्त विधानही ठाकूर यांनी केले. त्याचवेळी राहुल गांधीही उठून उभे राहिले आणि अनुराग ठाकूर यांना जबरदस्त प्रत्युत्तर दिले.

राहुल गांधी म्हणाले की, अध्यक्ष महोदय, जो कुणी दलितांचे प्रश्न उपस्थित करतो त्याला शिव्या ऐकाव्या लागतात. मी या सर्व शिव्या आनंदाने ऐकून घेईन. आम्हाला जातीनिहाय जनगणन हवी आहे. तसेच आम्ही ती करून घेऊ, त्यासाठी मला कितीही शिव्याशाप ऐकावे लागले तरी चालतील. अनुराग ठाकूर यांनी मला शिविगाळ केली आहे. मात्र मला त्यांच्याकडून माफीची अपेक्षा नाही, असे राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उभे राहत राहुल गांधी यांना पाठिंबा दर्शवला. सभागृहामध्ये कुणाची जात कशी विचारली जाऊ शकते? असा सवाल त्यांनी केला. यावर जगदंबिका पाल यांनी सभागृहात कुणीही कुणाची जात विचारणार नाही, अशी ताकीद दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;