Tamil Nadu – निलंबित केलेल्या विद्यार्थ्याने सहकारी विद्यार्थ्यासह शिक्षकावर केला चाकूहल्ला

Tamil Nadu – निलंबित केलेल्या विद्यार्थ्याने सहकारी विद्यार्थ्यासह शिक्षकावर केला चाकूहल्ला

तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतून निलंबित केलेल्या विद्यार्थ्यांने वर्गात प्रवेश करत सहकारी विद्यार्थ्यासह शिक्षकावर जीवघेणा हल्ला केला आहे. यामध्ये शिक्षकासह एक विद्यार्थी जखमी झाले असून श्रीरंगम शासकीय रूग्णालयात नेण्यात आले.

तामिळनाडूच्या त्रिची येथील श्रीरंगम बॉईज हायर सेंकेंडरी स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. हल्लेखोर विद्यार्थी हा बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थी असून त्याला काही दिवसांपूर्वी शाळेतून निलंबित करण्य़ात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास या हल्लेखोर विद्यार्थ्याने वर्गात प्रवेश केला. त्यानंतर त्याने वाणिज्य शाखेचे शिक्षक शिवकुमार यांच्या डोक्यावर चाकूहल्ला केला. त्यानंतर त्यांना तत्काळ श्रीरंगम शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. याबाबत पिडीत शिक्षक शिवकुमार यांनी सांगितले की, हल्लेखोर विद्यार्थ्याने गणवेश घातला नव्हता आणि चेहऱ्यावर मास्क लावले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दोन विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका संदेशावरुन त्यांच्यात वाद झाला. हल्लेखोर विद्यार्थी दुपारी घरी गेला होता आणि येताना तोंडावर मास्क लावून आला. त्यानंतर त्याने चाकू काढत विद्यार्थयावर हल्ला केला आणि हाताला दुखापत झाली. त्यावेळी वर्गात शिवकुमार नावाचे शिक्षक उपस्थित होते त्यांनी त्यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोक्यावरही चाकूने वार केले. सध्या तो विद्यार्थी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;