यशश्री शिंदे अत्याचाराच्या निषेधार्थ कवठे येथे कॅन्डल मार्च; गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्या, ग्रामस्थांची मागणी

यशश्री शिंदे अत्याचाराच्या निषेधार्थ कवठे येथे कॅन्डल मार्च; गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्या, ग्रामस्थांची मागणी

उरणमधील यशश्री शिंदे हिच्या हत्येचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटत आहेत. यशश्री शिंदेची अमानुष हत्या करण्यात आली. या आपल्या बहिणीला न्याय मिळावा यासाठी शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ग्रामस्थांनी सोमवारी सायंकाळी एकत्र येऊन कॅन्डल मार्च काढत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थांनी एकत्र येत मेणबत्ती पेटवून गावातून मुक मोर्चा काढला. यशश्री शिंदेला न्याय मिळालाच पाहिजे, गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, युवक या निषेध रॅलीत सहभागी झाले होते.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्या डॉ. कल्पना पोकळे,उद्योजक बाळासाहेब डांगे,सामाजिक कार्यकर्ते किसन हिलाळ,माजी सरपंच दीपक रत्नपारखी,चेअरमन साहेबराव कांदळकर,माजी चेअरमन बबनराव इचके,उपसरपंच मधुकर रोकडे,राष्ट्रवादीचे गटअध्यक्ष राजेंद्र सांडभोर,अविनाश पोकळे, मिठठूलाल बाफना,आबा वागदरे,शरद साळवे,रितेश शहा,डॉ.विजय वागदरे,सोपान वागदरे,केतन माटे,पांडुरंग भोर,सावंत बाई,कुळके काकी आदि ग्रामस्थ,तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;