विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येण्यासाठी जोमाने कामाला लागा; नाना पटोले यांचे आवाहन

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येण्यासाठी जोमाने कामाला लागा; नाना पटोले यांचे आवाहन

लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजप आणि एनडीएला त्यांची जागा दाखवली आहे. आता राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात महायुती सरकारविरोधात रोष आहे. त्यामुळे या निवडणुकीतही जनता महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले म्हणून गाफील राहू नका. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघीडीची सत्ता येण्यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले आहे. काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले.

लोकसभा निवडणुकीत जनता इंडिया आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. लोकसभेत चांगले यश मिळाले म्हणून गाफील राहू नका. विधानसभा निवडणुकीसाठीही मेहनत करा, जनतेपर्यंत जा, महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी काम करा, असे नाना पटोले म्हणाले आहेत. काँग्रेस सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत देशभरातील विविध पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन केली. तसेच राज्यात महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवली. आता राज्यातही परिवर्तन व्हावे ही जनतेची भावना आहे, आपण जनतेपर्यंत जाऊन महाविकास आघाडीचा विचार पोहचवला पाहिजे, असेही पटोले म्हणाले.

भाजप देश तोडण्याचे काम करत असताना राहुल गांधींनी यात्रेद्वारे देश जोडण्याचे काम केले आहे. संघटनेसाठी काम करणाऱ्यांची दखल देऊन त्यांना योग्य ती संधी दिली जाते. पक्षासाठी काम करा व विधानसभेवर महाविकास आघाडीच्या विजयाची पताका फडकवा, असेही नाना पटोले कार्यकर्त्यांना म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;