अच्छा सिला दिया…! नवऱ्याने परदेशात शिक्षणासाठी पाठवले, बायको मात्र चक्क बॉयफ्रेड घेऊन आली

अच्छा सिला दिया…! नवऱ्याने परदेशात शिक्षणासाठी पाठवले, बायको मात्र चक्क बॉयफ्रेड घेऊन आली

जपानमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या बायकोची स्वप्न साकार करण्यासाठी तिला पुढील शिक्षणसाठी विदेशात पाठवले. मात्र ती विदेशातून परतली त्यावेळी तिच्यासोबत प्रियकरालाच घरी घेऊन आली. दरम्यान जपानी शेफ आणि ब्लॉगर प्रिंस सॉय यांनी आपल्या आयुष्यातील ही स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली असून सध्या ती व्हायरल होत आहे.

प्रिंस रॉय याने व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील कथा सांगितली. आपल्या ब्लॉगमध्ये तो सांगतो की, त्याची पत्नी सियरा तिच्या पुढील शिक्षणासाठी वर्षभरासाठी ऑस्ट्रेलियाला गेली होती. तिथे तिची ओळख एका तरुणाशी झाली. आधी तो तिचा मित्र झाला आणि त्यानंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र कोर्सचा कालावधी संपल्याने सियराला पुन्हा जपानला परतावे लागले आणि तेव्हा ती तिच्या प्रियकरालाही सोबत घेऊन आली.

हा प्रकार पाहून तिच्या नवऱ्याला प्रचंड मोठा धक्का बसला. मात्र त्याने तिचे त्याच्यावरील प्रेम समजून घेत पत्नीसोबत तिच्या प्रियकराला घरात राहण्याची परवानगी दिली. सॉय पुढे म्हणाला की, तो आणि पत्नी दोघं बेडरूममध्ये झोपतात तर तिचा प्रियकर सोफ्यावर झोपतो. एकदा जेव्हा त्यांची पत्नी आणि तिच्या प्रियकरामध्ये वाद झाला, त्यावेळी सॉयने मध्यस्थी करत त्यांच्यातील वाद मिटवला.

प्रिंस सॉय सांगतो की, आम्ही तिघं एकाच घरात एकसाथ राहिलो. माझ्या बायकोच्या प्रियकर जवळपास एक आठवडा आमच्या घरी राहत होता. आम्ही सर्व मिळून घरातील काम करायचो. जवळपास आठवडाभऱ्यानंतर तिचा प्रियकर त्याच्या घरी गेला. मात्र आजही त्याची आठवण येते. कधीतरी त्याच्याशी व्हिडीओ कॉल करुन संपर्कात असतो. पुढे सॉय याने लिहीले की, मी पत्नीच्या प्रियकराशी कायम ऋणी राहिन कारण त्याने त्यावेळी माझ्या पत्नीसा साथ दिली ज्यावेळी ती विदेशात एकटी होती. तो खरंच फार वेगळा होता म्हणून माझी पत्नी त्याच्या प्रेमात पडली. प्रिन्स सोय अशा नात्यात अडकल्याबद्दल सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;