आता महिलांना कायदा हातात घ्यावा लागेल! शिवसेना महिला आघाडीचा खोके सरकारला इशारा
गेल्या 2 वर्षापासून राज्यासह ठाणे जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. रस्त्यावर फिरताना महिलांचे जगणे मुश्किल झाले आहे. कावेरी नाखवा, अक्षदा म्हात्रे आणि यशश्री शिंदे या महिलांना नाहक बळी गेल्यानंतरही सरकारला अजून जाग आलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नसून आता कायदा हातात घ्यावा लागला तरी आम्ही ते करू असा थेट इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीने दिला. यावेळी महिलांनी खोके सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करीत हल्लाबोल केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List