किंग खान शाहरूखच्या डोळ्याला होतोय त्रास, अमेरिकेत घेणार उपचार

किंग खान शाहरूखच्या डोळ्याला होतोय त्रास, अमेरिकेत घेणार उपचार

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान याच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शाहरुख खानच्या डोळ्यांना काहीतरी त्रास होत असल्याने त्याला तत्काळ शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. शाहरुखच्या शस्त्रक्रियेबाबत बातमी येताच त्याचे चाहते मात्र काळजीत पडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खान 29 जुलै रोजी डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील एका रुग्णालयात गेला होता. मात्र काही कारणामुळे त्यांच्यावर उपचार झाले नाहीत. बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, शाहरुख आता त्याच्या डोळ्यांवर उपचार करण्यासाठी अमेरीकेला जाणार असून मंगळवारी 30 जुलै रोजी रवाना होणाची शक्यता वर्तविण्यात आली आहेत. झूमच्या वृत्तानुसार, शाहरूख खानच्या एका डोळ्यात मोतीबिंदू झाला होता. ज्याच्यावर तो मुंबईच्या एका रूग्णालयात उपचार घेत होता. तर त्याच्या दुसऱ्या डोळ्यावर उपचार अमेरीकेत केले होते. मात्र शस्त्रक्रिया करूनही त्याच्या डोळ्याला त्रास होत होता. त्यामुळे आता त्याच्यावर उपचार करण्यासाठी तो पुन्हा अमेरीकेला जाणार आहे. याचवर्षी मे महिन्यात आयपीएल दरम्यान अहमदाबादमध्ये उष्माघाताच्या त्रासाने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

शाहरूख खान दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्या किंग या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याची मुलगी सुहाना खान देखिल दिसणार आहे. तसेच यामध्ये अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची शुटिंगही शाहरूखने सुरु केली असून 2025 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;