अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे दहशतवाद्यांना प्रेरणा, संजय राऊत यांची जोरदार टीका

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे दहशतवाद्यांना प्रेरणा, संजय राऊत यांची जोरदार टीका

अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे वेष बदलून आणि नाव बदलून मुंबई आणि दिल्ली विमानतळावर वावरत होते. त्यांच्या या कृतीमुळे दशहतवाद्यांना प्रेरणा मिळाली अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी जी ओळखपत्र वापरली ती जप्त करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

आज दिल्लीत संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा राऊत म्हणाले की, दिल्लीत अजित पवार आले. त्यांच्या नाट्यकलेविषयी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. मुंबईहून दिल्लीला येताना पवार 10 ते 12वेळा वेष पालटून आले. फक्त वेष नाही बदलला तर बनावट नावानेही आले. त्यांचे सर्व बोर्डिंग पास जप्त करावेत अशी मागणी राऊत यांनी केली. तसेच अजित पवार वेष पालटून आले होते, दाढी मिशा लावल्या होत्या, टोप्या घातल्या होत्या. अशा बऱ्याच गोष्टी केल्या ते स्वतः सांगत आहेत. या महाराष्ट्राला रंगभुमीची मोठी परंपरा आहे. अनेक कलावंत या रंगभुमीने या महाराष्ट्राला दिले आहेत. विष्णूदास भावे यांनी 1842-43 साली रंगभुमीची स्थापना केली. त्यानंतर हे बारामतीचे विष्णूदास निर्माण झाले आहेत असेही राऊत म्हणाले.

पण प्रश्न हा नाही, विमानतळाची सुरक्षा किती पोकळ आहे. कोणताही माणूस बनावट नावाने वेष पालटून दिल्ली आणि मुंबईसारख्या राजधानींच्या विमानतळांवर घुसू शकतो. आणि त्याच अवस्थेत तीच व्यक्ती या जाऊन देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन भेटतो. याचा अर्थ हा राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ झाला. यात देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री सामील आहेत. याची प्रेरणा घेऊन दहशतवादी घुसु शकतात. दाऊद इब्राहिम किती वेळा आला असेल यांच्या काळात? किंवा जे लोक परदेशात पळून गेलेले आहेत यांचे उद्योगपती त्यांनी अनेकवेळाला दिल्ली आणि मुंबई विमानतळावर प्रवास केला असेल का? दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, छोटा शकील यांनाही वेष पालटून मुंबई दिल्लीत येण्याची मुभा मिळली होती का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

यामुळे अतिरेकी आणि दहशदवाद्यांना प्रेरणा मिळाली आहे. माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की ते आणि एकनाथ शिंदे सरकार कोसळण्यापूर्वी वेष पालटून फिरत होते. माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत, या विमानतळावरून गेले तेव्हा तेव्हा ते मौलवीच्या वेषांत गेले होते. त्यांना दाढी आहेच. पण नाव बदलून ते मौलवी म्हणून दिल्लीत गेले होते. मौलवी शोभतात ते. जरी त्यांनी धर्मवीर चित्रपटाची निर्मिती केली असली जरी आनंद दिघेंचे ते शिष्य म्हणवून घेत असतील तरी तरे मौलवीच्या वेषात दिल्लीत गेले आणि अमित शहांना भेटले असे राऊत म्हणाले.

अजित पवार, एकनाथ शिंदे नाव बदलून वेषांतर करून दिल्लीत येतात. विमानळावर कोणी रोखत नाही याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेले आहेत. पॅन कार्ड असेल, पासपोस्ट असेल, आधारकार्ड असेल. कारण या ओळखपत्रांशिवाय सोडत नाहीत. या संदर्भात राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने दखल घेऊन चौकशी होणे गरजेचे आहे. आणि प्रवासात त्यांनी जी ओळखपत्र वापरली ती जप्त करून अजित पवार आणि इतर काही लोकांवर गुन्हे दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी व्हावी अशी मागणीही राऊत यांनी केली. यातून त्यांनी अतिरेकाला आणि दहशतवादाला प्रेरणा दिली आहे. आम्ही महाराष्ट्रातले काही प्रमुख नेते याच्यावर चर्चा करणार आहोत. आमच्यासाठी हा गंभीर विषय आहे. प्रश्न फक्त अजित पवार आणि अमित शाहांचा नाहिये. य़ा देशात चीन का घुसलेत, कश्मीरमध्ये अतिरेकी का घुसलेत. ही तालिम एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांनी दाखवून दिले आहे असेही राऊत यांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;