शाहरुख खानच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, उपचारासाठी जाणार परदेशात

शाहरुख खानच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, उपचारासाठी जाणार परदेशात

बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान याच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. अभिनेत्याच्या प्रकृतीची माहिती समोर येताच चाहत्यांनी देखील काळजी व्यक्त केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख याच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, अभिनेता पुढील उपचारांसाठी अमेरिकेत जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. मंगळवारी शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेत जाणार आहे. अभिनेता डोळ्यांच्या उपचारासाठी अमेरिकेत जाणार आहे. त्यामुळे भीतीचं आणि काळजी करण्याचं काही कारण नाही असं देखील सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख याच्यावर मुंबईत रुग्णालयात उपचार सुरु होते. पण काही गोष्टी ठरल्यानुसार न झाल्यामुळे शाहरुख खान अमेरिकेत रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे.

रिपोर्टनुसार, शाहरुख खान डोळ्यांच्या उपचारासाठी सोमवारी म्हणजे 29 जुलै रोजी मुंबई येथील एक रुग्णालयात गेला. पण उपचार ठरल्यानुसार न झाल्यामुळे अभिनेता अमेरिकेत जाणार आहे. सध्या सर्वत्र शाहरुख खान याच्या प्रकृतीचा चर्चा रंगली आहे .

सांगायचं झालं तर, मुलाखतीत शाहरुख खान याने मोठं वक्तव्य केलं होतं. ‘2024 मध्ये सिनेमांच्या सेटवर पुन्हा पदार्पण करण्यासाठी योजना आखल्या आहेत. सर्वकाही ठरलेलं आहे.’ दरम्यान किंग खान छोटा ब्रेक घेतला. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेत्याचा ‘डंकी’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्याआधी अभिनेता ‘पठाण’ आणि ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला होता.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by D’YAVOL X (@dyavol.x)

 

शाहरुख खान म्हणाला होता, ‘मला असं वाटतं थोडी विश्रांती घ्यायला हवी… मी 3 सिनेमांमध्ये काम केलं आहे. सिनेमात अनेक सीनमध्ये शारीरिक काम होते. त्यामुळे मी टीमला सांगून ठेवलं होतं की मी मॅच पाहायला जाणार आहे आणि शुटिंग जुलै किंवा ऑगस्टमध्ये करेल.. ‘ असं अभिनेता म्हणाला होता.

शाहरुख खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात शाहरुख पहिल्यांचा लेक सुहाना खान हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. चाहते देखील शाहरुख खान आणि सुहाना खान यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी उत्सुक आहेत.

शाहरुख खान याचे सिनेमे पाहण्यासाठी चित्रपटगृहात चाहत्यांची गर्दी जमलेली असते. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील किंग खान कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;