डॉन दाऊद इब्राहिमच्या प्रेमात मंदाकिनी, दोघांचा ‘तो’ फोटो समोर येताच माजली सर्वत्र खळबळ

डॉन दाऊद इब्राहिमच्या प्रेमात मंदाकिनी, दोघांचा ‘तो’ फोटो समोर येताच माजली सर्वत्र खळबळ

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा दबदबा फक्त गुन्हेगारी विश्वापुरता मर्यादीत नव्हता, बॉलिवूडमध्येही त्याची दहशत होती. अनेक बॉलिवूड कलाकारांना दाऊद इब्राहिम याने धमकावलं आहे तर, काही अभिनेत्रींना दाऊद इब्राहिम याने स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. अशाच एक अभिनेत्रीपैकी एक म्हणजे अभिनेत्री मंदाकिनी. मंदाकिनी हिने 80 आणि 90 च्या दशकात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील अभिनेत्रीच्या सौंदर्यावर फिदा होते. मंदाकिनी हिचं सौंदर्य आणि निळ्या डोळ्यांच्या प्रेमात अनेक पुरुष होते आणि यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचं देखील नाव होतं.

रिपोर्टनुसार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मंदाकिनी त्याकाळी रिलेशनशिपमध्ये होते. सुरुवातील याबद्दल कोणालाच काहीही माहिती नव्हतं. पण जेव्हा डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत मंदाकिनी हिचा एक फोटो व्हायरल झाला तेव्हा दोघांच्या नात्याची चर्चा तुफान रंगू लागली. संपूर्ण देशात फक्त आणि फक्त डॉन दाऊद इब्राहिम – मंदाकिनी यांच्या नात्याची चर्चा होती.

80 आणि 90 च्या दशाकात प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिलेली मंदाकिनी आता 61 वर्षांची झाली आहे. अभिनेत्रीचा जन्म 30 जुलै 1963 मध्ये झाला होती. सांगायचं झालं तर, तेव्हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचं बॉलिवूडवर वर्चस्व होतं. तेव्हाच मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिम यांच्याच प्रेम बहरलं.

मंदाकिनी हिने कधीच दाऊद इब्राहिम याच्यासोबत असलेलं नातं स्वीकारलं नाही. पण 1994 मध्ये समोर आलेल्या त्यांच्या एका फोटोमुळे सर्वत्र खळबळ माजली होती. 1994 साली दुबईच्या शारजाहच्या क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघांमध्ये सामना सुरू होता. दाऊद आणि मंदाकिनी सामना पाहण्यासाठी एकत्र आले होते.

 

 

स्टेडियममध्ये मंदाकिनी आणि दाऊत एकमेकांच्या बाजूला बसले होते. दोघांचा फोटो तुफान चर्चेत राहिला. पण त्या एका फोटोमुळे मंदाकिनी हिच्या करियरवर फार मोठा आघात झाला. दाऊद इब्राहिम याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे मंदाकिनी हिच्या करियरला ब्रेक लागला. अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिल्यानंतर मंदाकिनी अचानक बॉलिवूडपासून दूर झाली.

मंदाकिनी हिने करियरची सुरुवात 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ सिनेमातून केली. सिनेमात अभिनेत्रीसोबत राज कपूर यांची पूत्र राजीव कपूर होते. सिनेमामुळे एका रात्रीत मंदाकिनी यशाच्या शिखरावर पोहोचली. पण अभिनेत्रीचा लोकप्रियता फार काळ टिकली नाही. आता अभिनेत्री बॉलिवूडपासून पती आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;