कोर्टाने दखल घेतल्यानंतर ईडी अटक करू शकत नाही, मनी लॉण्डरिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे निर्देश
विशेष न्यायालयाने तक्रारीची दखल घेतल्यानंतर ईडी एखाद्या आरोपीला पीएमएलए कायद्याच्या 19 व्या कलमाखाली अटक करू शकत नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. ओडिशा प्रशासकीय सेवेतील अधिकारी बिजय केतन साहू यांची ईडीकडून बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. साहू यांना पीएमएलए कोर्टाने समन्स काढल्यावर त्यांनी अंतरिम जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावर झालेल्या सुनावणीत खंडपीठाने तरसेम लाल विरुद्ध ईडी खटल्यातील निकालाचा हवाला देत हे निर्देश दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List