26 हजारांहून अधिक शहीदांच्या शौर्यकथा पोर्टलवर
हवाई दलातून निवृत्त विंग कमांडर एमए अफराज यांनी देशभरातून 26 हजार शहीद आणि त्यांच्या कुटुंबीयांचा तपशील जमवला असून, honourpoint.in पोर्टलवर या शौर्यकथा मांडल्या आहेत. देशात जवळपास 200 युद्धस्मारके आहेत, मात्र तेथेही शहिदांची नावे-रँक-रेजिमेंटशिवाय त्यांच्याबाबत जास्त काही नाही. त्यांच्या कुटुंबाबाबत काही तपशील नाही. आमच्या या कथांमुळे शहीदांच्या गरजू कुटुंबांना मदत करण्यासाठी डॉक्टरांसह विविध क्षेत्रांतील लोक पुढे येत आहेत. हुतात्मे व त्यांच्या कुटुंबाची आठवण ठेवावी, हाच आमचा उद्देश आहे, असे अफराज यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List