नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कंटेनरची आठ वाहनांना धडक; विचित्र अपघातात 8 जण जखमी

नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कंटेनरची आठ वाहनांना धडक; विचित्र अपघातात 8 जण जखमी

नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्‍या कंटेनरने 8 वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये 7 ते 8 जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कंटेनरने रस्त्यामध्ये असलेल्या सात ते आठ वाहनांना धडक दिल्यानंतर एकमेकांवर वाहने आदळली गेली. या विचित्र अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते.

काही अंतरावर जाऊन कंटेनर चालकाने कंटेनेर तेथेच सोडून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात पाठवत वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 7ते 8 जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सोनेई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि वाहतूक सुरळित केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;