पेनल्टी, टेंडर, ब्लॅकलिस्ट हे फक्त दाखवण्यासाठी आहे का? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत मिंधे सरकारची चांगलीच सालटी काढली. भाजप आणि मिंधे सरकारकडून मुंबई, महाराष्ट्राची लूट सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच रस्ते घोटाळा, राज्यातील रस्त्यांची झालेली दुर्दशा, केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचीही दुर्दशा झाली आहे. राज्यातील गाजर बजेट आणि केंद्राचे भोपणा बजेट यात मुंबई, महाराष्ट्राला काहीही दिले नसून मुंबईची लूट सुरू आहे. मुंख्यमंत्र्यांची लाडका कंत्राटदार योजना सुरू आहे. आता आगमी निवडणुकीत आमचे सरकार येणार आहे. आमचे सरकार आल्यावर रस्ते घोटाळ्याची सखोल चौकशी करून लाडके कंत्राटदार, भ्रष्ट मंत्री यांना तुरुंगात पाठवणार, असेही आदित्य ठाकरे यांनी ठणाकवले.
मुंबई- गोवा महामार्गावरील खड्डे डिसेंबरपर्यंत हे खड्डे बुजविले जातील, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता आठ महिने झालेले आहेत. जुलै आलेला आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे. मात्र, खड्डे भरले गेलेले नाहीत. तसेच राष्ट्रीय महामार्गाची समस्याही तशीच आहे. मी नितीन गडकरी यांना विनंती करेन की तुम्ही गाडीने एकदा येऊन पाहा की किती खड्डे या महामार्गांवर पडले आहेत. देशात अनेक ठिकाणी चांगले रस्ते झाले, असे सांगण्यात येते. मग आमच्या महाराष्ट्र आणि मुंबईवरच अन्याय का, असा संतप्त सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.
एमएमआरडीएचे खातं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडे गेली दहा वर्षे आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर खड्डे आहेत ते आपल्याला दिसत आहेत. अपघात वाढत चालले आहेत. वांद्रे वर्सोवा सी लिंकसाठी 2017 मध्ये जेव्हा मुंबई महापालिकेने कोस्टल रोडचे काम हाती घेतले. आता 2017 पासून आतापर्यंत किती वर्ष झाली? कोस्टल रोडचे त्यांनी अर्धवट उद्घाटन केले जे आम्ही 2023 च्या डिसेंबरपर्यंत पूर्ण केले असते. वांद्रे वर्सोवा सी लिंकसाठी पावणे 7 हजार कोटींचा निधी वापरला गेला, एक सुद्धा गर्डर लागल्याचे काम झालेले नाही. दोनदा कंत्राटदार बदलले आहेत. सरकार तीन बदलले आहे, खाते मिंधे सरकारकडेच राहिलेले आहे. खाते घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडेच राहिलेले आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या खात्यात रस्त्याची कामे असतील, महानगरपालिकेची खाती असतील, कुठचेही काम असेल ते होऊदे किंवा न होऊदे एक्स्रकेलेशन 100 टक्के होते आणि त्यांच्याच आवडत्या मित्रांना कंत्राट मिळते. जसा नावडता महाराष्ट्र केंद्र सरकारच्या बजेटमध्ये होते तसेच लाडका कॉन्ट्रॅक्टर ही स्कीम गेली दोन वर्ष पाहतोय, महाराष्ट्राची लूट चालवलेली आहे, असा हल्लाबोलही आदित्य ठाकरे यांनी केला.
मी शब्द देतो येणारं सरकार आमचं आहे, महाविकास आघाडीचे आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे भ्रष्ट कंत्राटदार असतील, अधिकारी असतील, मंत्री असतील त्यांना आम्ही तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. हे खोके सरकार म्हणजे धोके सरकार, स्वतःसाठी खोके आणि जनतेला धोके, असे सध्या दिसत आहे. मुंबईतील किती रसत्यांची कामे पूर्ण झाली, किता 50 टक्के झाली, याची माहिती मिधेंनी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. याआधी मुंबईतील कोणत्याही कामासाठी अॅडव्हान्स पेमेंट झाले नव्हते. आता मिंध्यांनी ते का सुरू केले आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की,दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार. मात्र आता नवीन झालेल्या मार्गांवरही खड्डे पडायला लागले आहेत. तुम्ही कोस्टल रोड बघा ना तो हाजीअलीजवळ तिथे डांबर निघायला लागले आहे. टर्मिनल 1 चा पूल 3 महिने बंद ठेवला होता. मी दोनदा ट्विट केल्यानंतर त्यांना तो उघडावा लागला. आमचे सरकार आल्यावर मुंबई आणि महाराष्ट्राची लूट थांबवणार आणि लाडके कंत्राटदार, भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट मंत्री यांना तुरुंगात पाठवणारच, असेही आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List